१ शमुवेल 1:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटेल तसे कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा; परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले.” तेव्हा ती स्त्री घरी राहिली, आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “तुला जे उत्तम वाटते ते तू कर,” तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. “त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले. Viz kapitola |