१ राजे 22:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दूर जाऊ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.” Viz kapitola |