१ इतिहास 28:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील. Viz kapitola |