१ इतिहास 18:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता; म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हदरेजर व तोवू ह्यांच्या लढाया होत असत; हदोरामाने बरोबर हरतर्हेची सोन्यारुप्याची व पितळेची पात्रे आणली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या. Viz kapitola |