१ इतिहास 12:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.” Viz kapitola |