Online Bible

- Reklamy -

तीतुस 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी, पौलूस देवाचा दास अन् येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो, हे पत्र तीतुसले लिवत हावो, मी यासाठी निवडल्या गेलो हाय, कि देवाच्या निवडलेल्या लोकायच्या विश्वासाले अन् त्यायले देवाची खरी शिकवण समजण्यासाठी मदत करावी, कि त्यायनं भक्तीवान जीवन जगावं जे देवाले खुश करते.

2 याचा परिणाम ते लोकं अनंत जीवनाची आशा ठेवतीन कावून कि देव, जो कधी खोटं नाई बोलत, त्यानं हे जग बनण्याच्या पयले, हे वायदा केला होता.

3 अन् आता बरोबर वेळेवर देवानं आपला अभिप्राय त्या सुवार्थेच्या व्दारे पष्ट केला हाय, ज्याचा सुवार्थेचा प्रचार आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार मले त्याची जिम्मेदारी भेटली हाय.

4 ख्रिस्तात आमच्या विश्वासामुळे तीतुस तू माह्या खऱ्या पोरा सारखा हायस. आपला देवबाप अन् आपल्याले तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुले कृपा अन् शांती देवो.


पुढाऱ्यायची योग्यता

5 मी तुले यासाठी क्रेते टापू मध्ये राऊ देले, कि तू तितच्या मंडळीच्या समस्येले सोडवावे, अन् तितल्या हरेक मंडळीच्या पुढारी मध्ये लोकायची नेमणूक करावी. ह्या गोष्टीच्या बाऱ्यात माह्या निर्देशायले आठवणीत ठेव.

6 ज्या पुढारीची तू मंडळीत नेमणूक करशीन, तो मंडळीचा पुढारी, निर्दोष अन् एकाच बायकोचा नवरा असावा, ज्याचे लेकरं विश्वासी असावे, अन् त्या पुढारीवर अय्याशी करण्याचा अन् आज्ञा न मानण्याचा आरोप नसावा.

7 कावून कि मंडळीच्या अध्यक्ष देवाचा कारभारी असल्यामुळे निर्दोष असला पायजे, हटीला, रागीट, दारू पेणारा, भांडणे करणारा, नीच कमाईचा लोभी नसावा.

8 पण तो पाहूनचार प्रेमी, दुसऱ्याचे भलं करणारा, समजदार, न्यायी, पवित्र, अन् संयमी असला पायजे.

9 ते शिकवलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या खऱ्या संदेशावर मजबुतीने विश्वास करणारे असावे, ज्याच्या व्दारे ते लोकायले खरी शिकवण देऊन, विरोधी लोकायचे तोंड बंद करणारे असावे.


खोटे शिक्षक

10 मी असा यासाठी म्हणतो, कावून कि, बरेचं हायत, जे खऱ्या शिकवणीच्या विरोधात बोलतात विशेषक करून ते लोकं जे यहुदी जातीतून विश्वासी बनले. ते आपल्या अधिकाऱ्यायच्या गोष्टीचा तिरस्कार करतात, अन् बऱ्याचं लोकायले धोक्यात ठेवतात.

11 अशा लोकायले शिकवण देण्यासाठी मना करा, कावून कि ते नीच कमाई साठी चुकीची शिकवण देतात, अन् अशाप्रकारे सगळ्या कुटुंबांच्या विश्वासाले कमजोर करून टाकतात.

12 क्रेते टापूवर रायणारे लोकाय पैकी एक माणूस ज्याले लोकं भविष्यवक्ता समजतात, त्याने त्या लोकायच्या बाऱ्यात असं म्हतलं, कि “क्रेते लोकं नेहमी खोटं बोलतात; त्यायची वागणूक जंगली जनावरा सारखी हाय, ते आळशी हायत, अन् खादोडे हायत.”

13 हे साक्ष क्रेते टापूच्या लोकायच्या बाऱ्यात खरी निघाली, म्हणून तू त्यायले कठोर चेतावणी दे, कि ज्याच्याच्यान ते येशू ख्रिस्ताच्या खऱ्या शिकवणीवर विश्वास करतीन.

14 अन् यहुदी लोकायच्या काल्पनिक कथेवर मन नाई लावावे., अन् सत्यापासून भटकून जातात, त्या लोकायच्या आज्ञेवर मन नाई लावावे.

15 ज्या लोकायचे मन शुद्ध हाय, त्यायच्यासाठी सगळ्या गोष्टी शुद्ध हाय, अन् ज्या लोकायचे मन शुद्ध नाईत, त्यायच्यासाठी काईच शुद्ध नाई. जे खराब काम करतात, अन् येशूवर विश्वास करत नाईत, त्यायच्यात पापमय विचार हाय.

16 ते दावा करतात, कि ते देवाले ओयखतात, पण त्यायच्या कामापासून हे प्रगट होते, कि ते देवाले ओयखत नाई, ते घृणित अन् आज्ञा न मानणारे हायत, अन् कोणत्याही चांगल्या कामाच्या लायकीचे नाईत.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy