Online Bible

- Reklamy -

रोमियो 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी पौलूस, येशू ख्रिस्ताच्या सेवक, हे पत्र लिवत हाय, जो देवाच्या इकून प्रेषित होण्यासाठी निवडल्या गेलो हाय, अन् त्याच्या सुवार्थेच्या प्रचारासाठी अलग केला गेला हावो.

2 देवाने पयले पासूनच आपल्या भविष्यवक्त्यायच्या व्दारे पवित्रशास्त्रात त्या सुवार्थेची प्रतिज्ञा केली होती.

3 हे सुवार्था त्याचा पोरगा, आपल्या प्रभू येशूच्या बाऱ्यात हाय. त्याचा जन्म एका माणसाच्या रुपात, दाविद राजाच्या खानदानीत झाला होता.

4 अन् पवित्र आत्म्याच्या नजरेप्रमाणे मेलेल्यातून परत जिवंत होण्याच्या कारण सामर्थ्यासोबत येशू ख्रिस्त देवाचा पोरगा ठरला हाय.

5 देवाने मले ख्रिस्ताचे प्रेषित होण्याचे सौभाग्य अन् अधिकार देला हाय, कि त्याच्या नावाने सगळ्या जातीचे लोकं त्याच्यावर विश्वास करावे अन् ख्रिस्ताले स्वीकार करावे.

6 त्याच्यातून तुमी पण हा, जे येशू ख्रिस्ताचे लोकं होण्यासाठी बलावले गेले हा.

7 हे पत्र रोम शहराच्या त्या सगळ्यायच्या नावाने जे देवाचे प्रिय हायत, अन् ज्यायले पवित्र होण्यासाठी बलावले गेले हाय. आपला देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्तच्या इकून तुमाले कृपा अन् शांती मिळत राहो.


रोम शहरात जाण्याची इच्छा

8 सगळ्यात पयले मी तुमच्या सगळ्यायसाठी येशू ख्रिस्ताच्या इकून आपल्या देवाचा धन्यवाद करतो, कावून कि ख्रिस्त येशूवर तुमच्या विश्वासाची चर्चा हरेक जागी लोकायच्या मधात होऊन रायली हाय.

9 देव, ज्याची सेवा मी करतो, आपल्या संपूर्ण हृदयाने त्याच्या पोराच्या सुवार्थेच्या प्रचार करतो, तोच माह्या साक्षी हाय, कि मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमी लोकायले, नेहमी आठवण करत रायतो,

10 अन् नेहमी आपल्या प्रार्थनेत विनंती करतो, कि देवाच्या इच्छेने कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी तुमची भेट करऱ्याले येऊ.

11 कावून कि, मले तुमच्या संग भेटण्याची खूप इच्छा हाय; कावून कि मी तुमाले विश्वासात मजबूत बनण्यासाठी तुमाले कोणता आत्मिक वरदान देण्याची इच्छा ठेवतो.

12 म्हणजे हे कि जवा मी तुमच्या मधात राईन, तवा आपण त्या विश्वासाच्या व्दारे एकामेकाले प्रोत्साहित करू, जो माह्यात अन् तुमच्यात हाय.

13 हे विश्वासी भावायनो, माह्यी इच्छा हाय, कि तुमी जाणून घ्यावे, कि मी नेहमी तुमच्यापासी येण्याची योजना बनवली. कावून कि जसे अन्यजाती लोकात, तसचं तुमाले पण आत्मिक रूपाने मजबूत करण्यासाठी मदत करावी; पण आतापरेंत याच्यात अडथळा येत रायला.

14 याच्याने काई फरक नाई पडत, कि लोकं सभ्य किंवा असभ्य हायत, किंवा शिक्षित या अशिक्षित हायत, मी सगळ्यायले सुवार्था सांगण्यासाठी कर्जदार हाय.

15 म्हणून मी तुमाले पण जे रोम शहरात रायता, सुवार्था सांगण्यासाठी उत्सुक हाय.


धर्मी विश्वासाने जगीन

16 मले पूर्ण पणे सुवार्थेवर गर्व हाय, कावून कि हे सुवार्था सगळ्यायच्या तारणासाठी देवाची सामर्थ हाय, जे त्याच्यावर विश्वास करतात. सगळ्यात पयले यहुदी लोकायसाठी अन् युनानी लोकायसाठी पण.

17 सुवार्थेच्या व्दारे देव हे प्रगट करायची इच्छा करते, कि तो कसा लोकायले धर्मी बनू शकतो. हे सुरवाती पासून तर आखरी परेंत विश्वासावर आधारित हाय. जसं कि पवित्रशास्त्रात लिवलं हाय: “धर्मी माणूस विश्वासाच्या व्दारे जिवंत राईन.”


अधार्मिकतावर देवाचा क्रोध करणार

18 देव आपला क्रोध त्या सगळ्या लोकायवर स्वर्गातून प्रगट करते, जे आपल्या सगळ्या बेकार अन् अधार्मिकतेच्या कामाच्या व्दारे देवाचा खरेपणा जाणण्यापासून थांबवतात.

19 कारण हे हाय कि देवाच्या बाऱ्यात जे काई मालूम केल्या जाऊ शकते, ते पयले पासून त्यायच्यावर प्रगट हाय; कावून कि, देवानं स्वताले पष्ट पणे त्यायच्यावर प्रगट केलं हाय.

20 खरं हे हाय कि, जगाच्या सुरवाती पासूनच देवाचे अदृश्य गोष्टी म्हणजेचं त्याचे शास्वत सामर्थ अन् त्याचा ईश्वरत्वाले बुद्धीच्या डोयाच्या व्दारे त्याच्या कामाले पायल्या जावू शकते. म्हणून त्या लोकायजवळ स्वताले वाचव्यासाठी कोणता बायना नाई हाय, कि ते देवाले ओयखत नाई.

21 कावून कि त्यायनं देवाले ओयखून पण त्याले देवाच्या रुपात पूर्ण आदर अन् धन्यवाद नाई देला. त्यायची सगळी विचार शक्ती व्यर्थ होऊन गेली, अन् त्यायचे निर्बुद्धी मन अंधाराने भरून गेले.

22 ते स्वताले बुद्धीमान समजतात, पण मूर्ख बनले.

23 त्यायनं अविनाशी देवाच्या गौरव करणे सोडून नाशवान माणूस, अन् पाखरं, पशु, अन् सरपटणारे जंतू यायच्या मूर्तीची आराधना केली.

24 म्हणून देवाने पण त्यायले त्यायच्या मनाच्या बेकार इच्छेच्या अनुसार अशुद्ध होण्यासाठी सोडून देलं, कि त्यायनं आपसात बेकार काम करून आपल्या शरीराले अपवित्र करावे.

25 त्यायनं देवाच्या खऱ्यावर विश्वास नाई केला पण खोट्यावर विश्वास केला, अन् त्यायनं सृष्टी केलेल्या वस्तुची आराधना अन् सेवा केली पण त्या सृष्टी कर्त्याची नाई जो युगानुयुग धन्य हाय. आमेन.

26 हेच कारण हाय कि देवाने त्यायले त्यायच्या बेकार वासनाचे शिकार होऊ देलं. अतपर्यंत कि बायायन माणसायं सोबत स्वाभाविक समंध न करता, दुसऱ्या बायाय संग शरीरिक समंध ठेवायले सुरु केले.

27 माणसायन पण बायायसोबत स्वाभाविक रीतीने शारीरिक समंध सोडून, माणसायं संग शारीरिक समंध ठेवला, आपसात कामातुर होऊन जळू लागले, अन् अशाप्रकारे ते आपल्या भ्रष्ट वागणुकीचे योग्य फळ स्वता प्राप्त करतात.

28 जवा त्यायनं हे योग्य नाई समजले, कि देवाच्या खऱ्या ज्ञानाले स्वीकार करावे. म्हणून देवाने त्यायले ते सगळं काई करण्यासाठी जे योग्य नाई होतं. त्यायच्या भ्रष्ट बुद्धीवर सोडून देले.

29-31 ते सगळ्या प्रकारच्या अन्याय, दुष्टता, लोभ, अन् बेकार काम करणारे बनले. ते ईर्ष्या, हत्या, भांडणे, कपट, अन् दुष्टभावाने परिपूर्ण हायत. ते चुगलखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचे वैरी, दुष्ट, घमंडी, अन् मोठेपणा करणारे लोकं हायत. ते बेकार काम करण्यासाठी बनवणारे, माय-बापाची आज्ञा नाई मानणारे, अन् निर्बुद्धी अन् विश्वासघाती बनले हायत. त्यायच्यात प्रेम अन् दयेची कमी हाय.

32 त्यायले देवाचा हा नियम माईत हाय, कि असे बेकार काम करणाऱ्याचे दंड, मरण हाय. तरी पण ते स्वता तर हे काम करतातचं, अन् दुसऱ्या आणखी लोकायले, असे बेकार काम करणाऱ्यासाठी प्रोत्साहित करतात.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy