Online Bible

- Reklamy -

प्रकाशित वाक्य 1 - वऱ्हाडी नवा करार


परिचय

1 हे पुस्तक त्या गोष्टीचं वर्णन करते, जे देवाने येशू ख्रिस्ताले दाखवले. देवाने त्याले यासाठी दाखविले, कि त्याने आपल्या दासायले त्या घटनेच्या बाऱ्यात सांगू शकावे, ज्या लवकर होणार. तवा येशूने आपल्या देवदूतायले त्या संदेशा संग माह्यापासी अर्थात आपला दास योहानापासी पाठवले.

2 म्हणून मी, योहानाने सगळं काई लिवले, जे मी पायलं, मी या लेखात देवाचे संदेश अन् त्या खऱ्या विषयाच्या बाऱ्यात लिवून सांगितल्या हायत, ज्याची माईती येशू ख्रिस्ताने मले देली होती.

3 देव प्रत्येक व्यक्तीले आशीर्वाद देईन, जो या भविष्यवाणीले दुसऱ्यायले वाचून सांगते, अन् तो त्या प्रत्येक व्यक्तीले आशीर्वाद देईन, जो ते आयकते, अन् त्याले मानते. कावून कि ह्या गोष्टी लवकर होणार हायत.


सात मंडळीले योहानाच अभिवादन

4 मी, योहान, हे पत्र त्या सात मंडळ्या मधल्या विश्वासू लोकांना लिवत हाय, ज्या आशिया प्रांतात हायत. मी प्रार्थना करतो, कि तुमाले देवा कडून कृपा अन् शांती मिळावी. हा तोच देव हाय, जो अल्फा अन् ओमेगा हाय, अर्थात सुरुवात अन् शेवट हाय, मीच सर्वशक्तिमान हाय. जो होता जो हाय, अन् जो येणार हाय,

5-6 अन् येशू ख्रिस्ताकडून जो विश्वासूपणे देवाच्या सत्य प्रकट करते. तो एकमात्र हाय, जो मरणानंतर परत जिवंत झाला, अन् तो या पृथ्वीवरील सर्व राजांचा शासक हाय. तुमाले कृपा अन् शांती मिळो, जो आपल्यावर प्रेम करतो, ज्याने त्याच्या रक्ताच्या व्दारे आपल्याले पापातून मुक्त केले हाय, अन् आपल्याले असे लोकं बनवले ज्यायच्यावर आमचा देव राज्य करते, अन् आपल्याले याजक बनवले जे त्याची सेवा करतात. येशू ख्रिस्ताले गौरव अन् पराक्रम युगानुयुग मिळत राहो. आमेन.

7 पाहा तो ढगासोबत येणार हायत. प्रत्येक व्यक्ती त्याले पायणार. ज्यायनं त्याले भाल्याने खुपसले होते, ते पण त्याले येतांना पायतीन, पृथ्वीवरील सर्व लोकं मोठ्याने रडतीन जवा त्याले पायतीन. सत्य हेच हाय. आमेन.

8 प्रभू देव म्हणतो, “मी अल्फा अन् ओमेगा हाय, अर्थात सुरुवात अन् शेवट मीच हाय. मीच सर्वशक्तिमान हाय, जो होतो जो हाय, अन् जो येणार हाय.”


योहानाले ख्रिस्ताच दर्शन

9 मी योहान तुमचा विश्वासू भाऊ हाय, अन् येशू सोबत नात्यामुळे मी तुमच्या सोबत देवाच्या राज्यात, कष्टात अन् त्यांना सहन करण्याच्या शक्तीमध्ये सहभागी हावो, मी देवाचा संदेश अन् येशू ख्रिस्ताच्या बाऱ्यात प्रचार केल्यामुळे पतमुस नावाच्या टापू मध्ये कैदी होतो.

10 प्रभूच्या दिवशी देवाच्या आत्म्यान माह्याली अगुवाई केली, अन् मले तुरहीच्या आवाजा सारखा एक मोठा आवाज आपल्या मांगून हे म्हणताने आयकला.

11 तो मले म्हणाला, “जे काई तू पायत हाय, ते पुस्तकात लिवून, ते या इफिसुस शहर, स्मुरना, पिरगमुन, थुआतीरा नगर, सरदीस, फिलादेलफिया अन् लौदिकीया शहर या सात शहराच्या सात हि मंडळीले पाठव.”

12 मी हे पायण्यासाठी मागे फिरलो, कि कोण माह्या सोबत बोलत हाय, अन् मी सोन्याच्या सात समई पायल्या.

13 अन् त्या समईच्या मध्ये, मी एखाद्या माणसाच्या पोरा सारख्या दिसणाऱ्या कोणाले पायले, तो उंच झगा घालून होता, जो पायाजवळ पोहचत होता, त्याने आपल्या शरीराच्या वरच्या छातीवर चारही बाजूनी सोन्याचा कमरपट्टा घातला होता.

14 त्याच्या डोक्याचे केसं कापसासारखे अन् बर्फासारखे पांढरे होते, त्याचे डोये आगीच्या ज्वालासारखे चमकत होते.

15 त्याचे पाय पितळा सारखे चमकत होते, जसा गरम आगीत चमकते, जवा तो बोलला, तवा त्याची आवाज खूप मोठी होती, जसे एक मोठ्या धबधब्याची आवाज.

16 तो आपल्या उजव्या हातात सात तारे घेऊन होता, अन् त्याच्या तोंडातून धारदार दोधारी तलवार निघत होती, अन् त्याचे तोंड असे प्रज्वलित होते, जसा सूर्य दुपारच्या वेळेस चमकतो.

17 मी त्याले पाऊन मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायावर पडलो. पण त्याने माह्यावर उजवा हात ठेवून म्हतलं, “भेऊ नकोस” मी सुरुवात अन् शेवट हावो, मी जीवनाचा स्त्रोत हावो.

18 पाहा मी युगानुयुग जिवंत हावो, मी एकदा मेलो होतो, पण आता मी जिवंत हाय, अन् मी नेहमी जिवंत राईन. माह्यापासी त्या किल्ल्या हायत, जे ते जागा उघडायची शक्ती देते, जती मेलेले लोकं हायत, अन् त्यायले परत जिवंत करण्याची शक्ती देते.

19 “म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता तू पाऊन रायला हाय, ज्या यानंतर होणार हाय, पुस्तकात लिवून ठेव.”

20 आता मी तुले सांगीन, कि माह्या उजव्या हाताच्या सात ताऱ्यांचा अर्थ काय हाय, अन् सोन्याच्या सात समईचा अर्थ काय हाय, ज्याचे ज्ञान पयले नाई होते. सात तारे त्या देवदूतायले दर्शवतात, जे सात मंडळ्यायची संरक्षण करतात, अन् सात समई सात मंडळ्यायले दर्शवतात.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy