फिलिप्पियों 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 मी पौलूस व तीमुथियुस, ख्रिस्त येशूचे दास ह्याच्याकडून; फिलिप्पी शहरातील रायनाऱ्या देवाच्या लोकायले, सोबतच अध्यक्ष अन् सेवकायले हे पत्र लिवत हावो. 2 मी प्रार्थना करतो कि, आमचा देवबाप, अन् प्रभू येशू ख्रिस्तच्या इकून कृपा अन् शांती तुमाले मिळत राहो. धन्यवाद अन् मंडळीसाठी प्रार्थना 3 मी जवा-जवा तुमची आठवण करतो, तवा देवाचा धन्यवाद करतो. 4 जवा-जवा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तवा सगळ्यायसाठी आनंदाने प्रार्थना करतो. 5 यासाठी कि पयल्या दिवसापासून तर आजपरेंत तुमी सुवार्था पसरवण्याच्या कामात माह्यी मदत केली हाय. 6 मले पूर्ण विश्वास हाय, कि ज्या देवाने तुमी लोकात हे चांगलं काम सुरु केलं हाय, तो येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवसापरेंत पूर्ण पण करीन. 7 अन् तुमच्या सगळ्यायच्या बद्दल मले असं वाटते कावून कि आता मी बंदी हाय, अन् जवा मी सुवार्थेसाठी, उत्तर अन् प्रमाण देण्यासाठी स्वतंत्र रुपात कार्य करत होतो. त्यावाक्ती पण, तुमी सगळे माह्या संग त्या कृपेत सहभागी झाले, जे देवाने माह्यावर केली हाय. 8 मी खरं सांगतो, तुमच्या सगळ्यायसाठी माह्या मनात हे खोल भावना स्वता येशू ख्रिस्तापासून येते, या गोष्टीत देव माह्या साक्षी हाय. 9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमचा प्रेम वास्तविक ज्ञानात अन् विवेक मध्ये अधिकाधिक वाढत जावो. 10 यासाठी की तुमी उत्तम-उत्तम वस्तुचे बरोबर निवड करण्यात योग्य बना. कि जवा ख्रिस्त येणार तवा तुमी त्या दिवशी सगळ्या अशुद्धता अन् दोषापासून स्वतंत्र होसान. 11 तुमचे जीवन धार्मिकतेच्या चांगल्या स्वभावाने भरावे, जे फक्त येशू ख्रिस्तचं तुमच्या अंदर उत्पन्न करू शकते, ज्याच्या व्दारे देवाचा गौरव अन् स्तुती होतं राहो. कैदीच्या रुपात सेवा 12 हे विश्वासी भावायनो माह्यी इच्छा हाय कि तुमी हे जाणून घ्यावे, कि जे माह्यावर घडले हाय, त्याच्यामुळे सुवार्थेच्या प्रचाराचे काम अधिक वाढायले मदत झाली हाय. 13 अतपर्यंत कि सम्राटच्या राजभवनातले सैनिकाचे सगळे दल अन् त्यातल्या बऱ्याचं लोकायले हे मालूम झालं कि, मी येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या कार्यामुळे जेलात हावो. 14 अन् मी बंदी असल्यामुळे प्रभू मध्ये जे भाऊ हायत, त्यायच्यातून बरेचशायले हिम्मत भेटली हाय. ते प्रभूवर भरोसा ठेवून पयले पेक्षा जास्त हिम्मतीने न भेता देवाचे वचन सांगत हायत. 15 काई लोकं माह्या संग वैरभाव करून अन् भांडणाच्या कारणाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, अन् काई चांगल्या मनाने करतात. 16 काई लोकं तर हे समजून, प्रेमाने प्रचार करतात, कि मले सुवार्थाचे प्रतिउत्तर प्रमाणित करण्यासाठी सोपल्या गेलं हाय. 17 अन् काई लोकं तर खरेपणाने नाई पण विरोधाने ख्रिस्ताची सुवार्था सांगतात, असं करण्याच्या व्दारे ते विचार करतात कि ते माह्यासाठी जेलात आणखी समस्या उत्पन्न करतीन. 18 याने मले काई फरक नाई पडत. बेकार उद्देशाने किंवा चांगल्या उद्देशाने असो, कोणत्याही प्रकारे असो, ख्रिस्ताच्या प्रचार होऊन रायला हाय. मी याच्यामुळे आनंदित होतो, अन् आनंद करत राईन. 19 कावून कि मले मालूम हाय, कि, तुमच्या प्रार्थने व्दारे अन् देवाचा आत्मा जो येशू ख्रिस्ताच्या इकून येते, त्याच्या साह्याने माह्ये तारण होणार. जिवंत रायने ख्रिस्त 20 माह्यी हे इच्छा अन् आशा हाय, कि मले कोणत्या गोष्टीमुळे लज्जित नाई व्हावं लागीन, पण मी पूर्ण हिम्मतीने ख्रिस्ताच्या बाऱ्यात बोलणार, जसं आतापरेंत पण केलं हाय. ज्याने माह्या शरीरात, जिवंत अवस्थेत असो, किंवा मरणाच्या दशेत असो, ख्रिस्ताचा गौरव होतं राहो. 21 कावून कि मले तर जिवंत रायने हे ख्रिस्त, अन् मरणे हे लाभ हाय. 22 पण जर मी शरीरात जिवंत हाय, तर आणखी पण सामर्थ्याचे काम करू शकतो, पण कोणते निवडावे हे मले समजत नाई. 23 मी दोन्ही इकून पेचात हावो, मी या जीवनाले त्यागून ख्रिस्तापासी जायाची इच्छा करतो, जे माह्यासाठी आणखी चांगले हाय. 24 तरी पण मले जिवंत रायने हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक हाय. 25 मले हा निश्चय हाय, अन् मले हे मालूम हाय, कि मी जिवंत राईन अन् तुमच्या सोबत राऊन तुमची मदत करीन. ज्याने तुमी विश्वासात वाढत जावे, अन् आनंदित राहावे. 26 जवा मी तुमच्यापासी परत येईन, ख्रिस्त येशू जो माह्या व्दारे करत हाय, त्याच्या कारण तुमी ख्रिस्त येशूवर आणखी अधिक गौरव करत राहावे. ख्रिस्तासाठी दुख उचलणे 27 फक्त एवढे करा, कि तुमचं चालचलन ख्रिस्ताच्या सुवार्थेले शोभीन असं असले पायजे, जर मी येऊ किंवा ना येऊ, तुमच्या बाऱ्यात हे आयकू शकू कि तुमी एका उद्देशामध्ये मजबूत हा, अन् एकत्र होऊन सुवार्थेच्या त्या विश्वासासाठी कठीण परिश्रम करत हा. 28 अन् आपल्या विरोधीयांना जे तुमाले सतावतात, त्यायले भेऊ नका. नेहमी हिम्मत ठेवा, याने हे पष्ट होईन कि ते नाश होईन, अन् तुमी जिंकणार कावून कि देव तुमाले तारण देते. 29 कावून कि तुमी लोकायले ख्रिस्तात फक्त विश्वास करायचाचं नाई, तर त्याच्यामुळे दुख सहन करायचं वरदान पण भेटलं हाय. 30 आता तुमी माह्या संग या लढाई मध्ये भाग घेऊ शकता. हे तेच युद्ध हाय, ज्याले तुमी मले फिलिप्पी शहरात लढताना पायले, अन् जसे कि तुमी आयकता, त्याचं लढाई मध्ये मी आजपरेंत पण लढत हावो. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation