फिलेमोन 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1-2 मी पौलूस, जो ख्रिस्त येशूच्या प्रचाराच्या कारणाने बंदी हावो, अन् आपला भाऊ तीमुथियुस पासून पण जो माह्या दोस्त अन् सहकर्मी हाय, फिलेमोनाला, अन् आपली विश्वासी बहिण अफफियाले अन् आमचे सोबतचे सैनिक अर्खीप्पूस अन् फिलेमोनाच्या घरी एकत्र होणाऱ्या मंडळीले हे पत्र लिवत हावो. 3 आमचा देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्तच्या इकून कृपा अन् शांती तुमाले मिळत राहो. धन्यवाद अन् प्रार्थना 4 माह्या भाऊ फिलेमोन, जवा-जवा मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुले आठवण करतो, तवा आपल्या देवाले नेहमी धन्यवाद देतो. 5 कावून कि मी येशू मध्ये तुह्या विश्वास अन् देवाच्या सगळ्या पवित्र लोकायसाठी तुह्या प्रेमाच्या बाऱ्यात आयकतं हाय. 6 मी प्रार्थना करतो, विश्वासात तुह्या सहभागीतेच्या व्दारे तुमी पूर्ण पणे त्या सगळ्या चांगल्या वस्तुले समजले पायजे, जे देवाने आपल्याले देले हाय, अन् याच्यामुळे लोकं ख्रिस्ताचा गौरव करीन. 7 कावून कि हे प्रिय भावा, मी दुसऱ्याच्या विषयी तुह्या प्रेमामुळे खूप आनंदित अन् प्रोत्साहित हावो, कावून कि दुसऱ्याच्या प्रती तुह्या प्रेमामुळे, पवित्र लोकायचे मन आनंदित होते. उनेसीमूस साठी निवेदन 8-9 मी तुले काई असं कराले सांगू शकतो, जे तुले कराले पायजे. मी त्या अधिकाराचा उपयोग घेऊ शकतो जे ख्रिस्ताने मले देले हाय, कि तुमी असं करावं, पण मी असं नाई केलं. याच्या वेतीरिक्त मी तुमाले फक्त हे करायले सांगू रायलो हाय, कावून कि आपण एकामेकावर अन् देवाच्या लोकायवर प्रेम करतो. मी पौलूस तुमाले एक बुढा माणसाच्या रुपात विचारत हाय, अन् कोण्या असा माणसाच्या रुपात ज्याले लोकायन जेलात टाकले हाय, कावून कि मी येशू ख्रिस्ताचा प्रचार करतो. 10 मी उनेसीमूस साठी विनंती करतो, जे माह्यासाठी पोरा सारखा हाय. जवा तो जेलात होता, तवा ख्रिस्तात माह्या तो पोरगा बनला. 11 तो तर पयले तुह्या काई कामाच्या नव्हता, पण आता तुह्या अन् माह्या मोठ्या कामाचा हाय, 12 मी उनेसीमूसले तुह्यापासी वापस पाठवत हाय, ज्याले मी पूर्ण ह्रदयाने प्रेम करतो. 13 मी जो सुवार्थेमुळे बंदी हाय, याले अती आपल्यापासी ठेवाची इच्छा करतो, ज्याने हा तुह्या कळून माह्याली सेवा करीन. 14 पण तुह्या संमती शिवाय काई करणे मले बरे नाई वाटले, ज्याने तू हा उपकार लाचारीने नाई, पण स्वताच्या इच्छेने कर. 15 कावून कि काय माईत उनेसीमूस तुह्याल्या पासून काई दिवसासाठी याच्याच्यान अलग झाला होता, कि नेहमी तुह्याला जवळ राहावं, 16 आतापासून त्याले दास नको समजू. तो एका दासावून मोठा हाय. तो आता एक विश्वासी भाऊ हाय ज्याले तू प्रेम करू शकते. मी त्याले खूप प्रेम करतो, पण तू त्याले एका विश्वासी भावाच्या रुपात जास्त प्रेम कराले पायजे, कावून कि तो ख्रिस्तात प्रिय भाऊ हाय. फिलेमोनाचे आज्ञापालन 17 म्हणून जर तू मले आपला भागीदार समजतो तर जवा उनेसीमूस तुह्या जवळ वापस येईन, तवा त्याले याप्रकारे स्वीकार कर जसं मले स्वीकार करत हाय. 18 अन् जर त्यानं तुह्यालं काई नुकसान केलं अशीन तर या त्यावर तुह्याले काई कर्ज हायत, तर माह्या नावान लिवून ठेवजोक, अन् मी ते कर्ज स्वता देऊन देईन. 19 मी पौलूस आपल्या हाताने लिवतो, कि मी स्वता त्याचे पैसे तुले त्याची भरपाई करून देईन, अन् आमाले हे म्हण्याची काहीही आवशक्ता नाई, कि माह्याले कर्ज जे तुह्यावर हाय, ते तुचं हाय. 20 हे भाऊ, हा आनंद मले प्रभू मध्ये तुह्या इकून भेटो, ख्रिस्तामध्ये माह्या जीवाले प्रोत्साहित करून दे. 21 जवा मी तुले लिवत हाय, व मले माईत हाय, कि जे मी तुले म्हणीन ते तू करशीन, अन् त्याच्या पेक्षा ज्यास्त करशीन. 22 अन् आणखी एक गोष्ट मी तुले सांगतो, माह्यासाठी तुह्यावाल्या घरी एक खोली तयार कर, कावून कि मले आशा हाय, देव तुह्यावाल्या प्रार्थनाच उत्तर देईन, कि मी येईन अन् तुले अजून भेटीन. आखरी अभिवादन 23 इपफ्रास जो माह्या संग बंदी हाय, कावून कि तो येशू ख्रिस्ताची सुवार्था सांगते. तो तुले नमस्कार करत हाय. 24 अन् मार्क अन् अरिस्तर्खुस अन् देमास अन् लूका जे देवाचे काम माह्या संग करत होते, त्यायच्या कडून तुले नमस्कार. 25 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर बनून राहो, आमेन. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation