यहूदा 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 मी यहुदा, येशू ख्रिस्ताचा सेवक, अन् याकोबचा लहान भाऊ त्या लोकायले हे पत्र लिवत हावो, जे देवाच्या व्दारे बलावलेले हायत, अन् जे आपल्या देवबापाचे प्रिय हायत, अन् येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित हायत. विश्वासासाठी संघर्ष 2 मी प्रार्थना करतो, कि देव तुमाले दया शांती अन् प्रेम जास्तीस जास्त देवो. 3 हे माह्या प्रिय लोकायनो, मी तुमाले त्या तारणाविषयी लिवण्यासाठी प्रयत्न करतो, जो येशू ख्रिस्ताच्या व्दारे देवा कडून येतो. अन् ज्याच्यात आमी सगळे सहभागी हावो. पण आता मले या पत्रा व्दारे तुमाले समजावने जरुरी समजतो, कि तुमी ख्रिस्ती विश्वासाले पकडून रायण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, देवाने आपल्या लोकायसाठी हा विश्वास एकच वेळा नेहमी करिता देऊन देला, याले बदलता येऊ शकत नाई. 4 मी तुमाले यासाठी लिवत हाय, कावून कि काई असे लोकं हायत जे येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याचा दिखावा करतात, ते तुमच्यात लपून आले. ते हे लोकं हायत, ज्यायच्या बाऱ्यात देवाने कईक वर्षा पयले पवित्रशास्त्रात म्हतलं होते. “तो त्यायले दंड देईन” कावून कि ते देवाच्या कृपेच्या संदेशाले बिगडतात अन् म्हणतात कि देव आपल्या पापाले क्षमा करतो, कि त्यायले शारीरिक कुकर्म सारख्या दुष्ट व्यवहार करण्याचा बायना बनवू शकावे, ते आमचे एकमात्र स्वामी अन् प्रभू येशू ख्रिस्ताले पण अस्वीकार करतात. 5 जरी तुमाले सगळी गोष्ट मालूम झाली हाय, तर मी तुमाले या गोष्टीची आठवण देतो, कि प्रभून इस्राएली लोकायले गुलामीतून सोडवून त्यायले मिस्र देशातून बायर काढले, पण नंतर त्याने त्यायले मारून टाकले, ज्यायनं मरुभूमी मध्ये त्याच्यावर भरोसा केला नाई. 6 आठवण करा, कि प्रभूने त्या दूतायले कसा अनंत दंड देला हाय, ज्यायनं आपली जिम्मेदारी निभवली नाई, पण त्यायनं आपले नियम स्थानाले सोडले हाय, प्रभून या देवदूतायले अंधाराच्या जागी ठेवले, अन् अशा साखयदांडाने बांधले हाय, ज्यायले कोणी तोडू शकत नाई, कि त्या महान दिवशी त्यायचा न्याय हो. 7 या इस्राएली अन् देवदूता सारखे, त्या लोकायले पण आठवण ठेवा, जे सदोम शहर अन् गमोरा शहर अन् त्यायच्या आजूबाजूच्या ठिकाणावर रायतात, त्यायच्या सोबत काय झाले हाय, ते लोकं व्यभिचारी झाले अन् हर प्रकारच्या अनैतिक कामात डुबले होते, म्हणून देवाने त्यायले आगीने नाश केले, त्यायच्या सोबत जे झाले, ते या खोट्या शिक्षकायसाठी एक चेतावणी झाले होते, कि त्यायले पण अग्निकुंडात दंड मिळावा. 8 या उदारणा विषयी जाणून घेतल्यावर, ते खोटे भविष्यवक्ता असचं पाप करतात, हे म्हणून कि देवाने त्यायले दर्शन देले हाय, कि ते बेकार रीतीने जीवन जगून आपल्या स्वताच्या शरीराले भ्रष्ट करतात. त्यायले कोणाच्याही अधिकारात रायण्याची गरज नाई, अन् ते गौरवशाली देवदूतायच्या विषयी पण बेकार बोलतात. 9 अन् अतपर्यंत कि मुख्य देवदूत मिकाईलने पण तसे नाई केले, जसे हे खोटे भविष्यवक्ता करत हायत. जवा सैतानाने मिकाईल देवदूता सोबत या गोष्टी संदर्भात विवाद केला, कि त्यायच्यातून कोणाले मोशेच्या शरीराले रोयण्याचा अधिकार हाय, जरी मिकाईल देवदूतापासी या लोकाय पेक्षा जास्त अधिकार हाय, तरीही त्याने सैताना सोबत बेकार गोष्टी नाई केल्या, अन् त्याच्यावर दोष नाई लावला, फक्त त्याने एवढेच म्हतलं, “प्रभू तुले दटाविन.” 10 पण हे लोकं त्या गोष्टीच्या विरुद्ध वाईट बोलतात, जे ते समजत नाई, अन् ज्या गोष्टीले ते समजतात, अन् स्वाभाविक पणे जनावरांसारखे करतात, तर ते त्या पापमय काम करण्याच्या व्दारे आपल्या स्वताले नाश करून टाकतात. 11 त्यायच्यासाठी किती भयानक होणार! ते आदमचा पोरगा कैन सारखे हायत, ज्याने आपल्या भावाले मारून टाकले. ते बिलाम सारखे हायत, ज्याने पैसासाठी देवाच्या लोकायले पाप करण्यासाठी उकसवण्याचा प्रयत्न केला. ते लोकं कोरह सारखे नाश होतीन, ज्यानं मोशेच्या विरुद्ध विद्रोह केला होता. 12 ते लोकं खराब विचारावाले हायत, अन् आपल्या श्रमाच्या अन् स्वार्थी कामामुळे आपल्या व्दारा प्रेमपूर्वक खाल्लेल्या जेवणाले नाश करून टाकतात, ते त्या ढगासारखे हायत, जे हवेच्या व्दारे उडवल्या जातात, पण ते जमिनीवर पाणी नाई पाडत, फक्त गरजतात. ते पिकाच्या कापणीच्या वाक्ती त्या झाडायसारखे असतात, जे मेलेले असतात, कावून कि ते कोणतेही फळ देत नाईत म्हणून त्यायले बुडापासून उखडल्या जाते. 13 हे लोकं समुद्राच्या मोठ्या लाटे सारखे हायत, ज्या आपल्या लज्जेच्या कामाले, फेसाच्या रुपात उसळवतात. हे लोकं भटकलेल्या ताऱ्या सारखे हायत, जे आपल्या नेमलेल्या रस्त्यावर नाई चालत. प्रभू त्या लोकायले त्यायच्यासाठी मोठा अंधार अनंत काळापरेंत ठेवले हाय, जती त्यायले नेहमी साठी राहावे लागीन. 14-15 हनोक जो आदमाच्या सातव्या पिढीत जन्मला होता, या लोकायच्या बाऱ्यात भविष्यवाणी केली होती, अन् त्याने म्हतलं होते, “पाहा प्रभू निश्चित पणे आपल्या पवित्र देवदूतायच्या मोठ्या संख्येने येणार” जो सगळ्या लोकायचा न्याय करण्यासाठी, “अन् सगळ्या पापी लोकायवर त्यायच्या व्दारे केल्या गेलेले, अनैतिक अन् बेकार कामामुळे दोष लावण्यासाठी, अन् त्या सगळ्या खराब गोष्टी साठी ज्या त्यायनं त्याच्या विरुद्ध केल्या हाय.” 16 हे लोकं नेहमी दुसऱ्या लोकायच्या विरुद्ध कुरकुर करतात, अन् एकमेकात गलती पायतात, ते नेहमी त्या बेकार कामायले करतात, जे त्यायच्या मनाले करायला वाटते. ते आपल्या विषयात गर्वाने निश्चय करतात, अन् स्वताच्या फायद्यासाठी, दुसऱ्या लोकायची चापलुशी करतात. प्रयत्नशील राहा 17 पण हे प्रियांनो, तुमी त्या गोष्टीची आठवण ठेवा, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितायन पयले म्हतलं होते, कि हे होणे आवश्यक हाय, ते नंतर होणार. 18 ते तुमाले म्हणत होते, “आखरी दिवसामध्ये असे लोकं असणार, जे प्रभू अन् त्याच्या लोकायची मजाक करतीन, हे ते लोकं असतीन, ज्यायचे जीवन अभक्तिच्या अभिलाषेच्या नियंत्रणात असणार.” 19 हेच ते लोकं हायत, जे तुमच्या मध्ये फुट पाडण्याचे काम करतात, ते आपल्या स्वताच्या स्वाभाविक इच्छेनुसार व्यवहार करतात, अन् त्यायच्यात पवित्र आत्मा नाई हाय. 20 पण प्रियांनो, तुमी स्वता आपल्या अती पवित्र विश्वासात वाढत जा, तुमी पवित्र आत्माच्या सामर्थ्या पासून मार्गदर्शन प्राप्त करून प्रार्थना करत राहा. 21 तुमाले हे जाणून जीवन जगले पायजे, कि देव तुमच्यावर प्रेम करतो. कि जोपरेंत तुमी त्या दिवसाची वाट पायत हा, जवा आपला प्रभू येशू ख्रिस्त वापस येईन, तवा तुमाले अनंत जीवन मिळावे, कावून कि त्याने आपल्यावर दया केली हाय. 22 त्या लोकायच्या प्रती दयावान बना, ज्यायले मालूम नाई, कि कोणत्या शिकवणीवर विश्वास करावा, अन् ज्यायचा विश्वास डगमगुन रायला हाय. 23 खूप जनायले न्यायाच्या आगीतून वाचवून बायर काढा, पण काई लोकायवर दया करतांना सावध राहा, अतपर्यंत कि त्या कपड्यायची पण घृणा करा, ज्यावर त्यायनं आपल्या पापमय कामामुळे दाग लावले. देवाची स्तुती 24-25 फक्त देवचं हाय, जो तुमाले पापमय जीवनामुळे पडण्यापासून वाचवू शकते, अन् तुमाले आनंदित करू शकते. जवा तो तुमाले आपल्या गौरवात आपल्या समोर उभा करतो. त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्दारे आपले तारण केले हाय. गौरव, पराक्रम, सामर्थ्य, अन् अधिकार वेळेच्या सुरवाती पासूनच त्याचे होते, आता पण त्याचे हायत, अन् नेहमी साठी त्याचेचं रायणार. आमेन. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation