याकूब 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 देवाच्या अन् प्रभू येशू ख्रिस्ताचा दास, मी याकोब, हे पत्र लिवत हाय. जे साऱ्या जगात पसरलेले हाय, त्या यहुदी बारा गोत्रायले ख्रिस्ती लोकायले लिवत हाय, अन् त्यायले नमस्कार करत हाय. परीक्षाचे महत्व 2 हे माह्या विश्वासी भावायनो जवा तुमी अलग-अलग प्रकारच्या संकटात पडसान, तवा हे आनंदाची गोष्ट समजा. 3 कावून कि तुमाले माईत हाय, कि तुमच्या विश्वासाले परखल्याने धीरज उत्पन होते. 4 पण धीरजले आपले कार्य पूर्ण करू द्या, कि तुमी आत्मिकते मध्ये सिद्ध होऊन जा, कि तुमच्या चांगल्या स्वभावात कोणत्याही गोष्टीची कमी नसावी. 5 पण जर तुमाले कोणाले बुद्धीची कमी अशीन तर देवाले मांगा जो दोष न लावता मोठ्या मनान सगळ्यायले देतो, अन् त्याले देली जाईन. 6 पण विश्वासाने मांगा अन् काहीही शंका नका करू कावून कि शंका करणारा समुद्राच्या लाटे सारखा हाय, जो हवेने इकडे तिकडे वायते. 7-8 अशा माणसानं हे नाई समजावे, जे मले प्रभू पासून काई भेटन, कावून कि अशा माणसाचे मन दोन चित्ताचे हाय, अन् तो भरोसा ठेवण्या योग्य नाई हाय. धनवान अन् गरीब 9 असे विश्वासी लोकं जे गरीब हात त्यायनं आनंद केला पायजे, कावून कि देवाने त्यायचा आदर केला हाय. 10 जे विश्वासी धनवान हायत, त्यायले आनंदित होयाले पायजे, कि देवाने त्यायले नम्र केलं हाय, कावून कि ते जंगलातल्या गवताच्या फुलासारखे नाश होऊन जातीन. 11 सुर्य निघाल्यावर जवा कड्याक्याची उन्हं पडते, अन् गवत सोकते अन् त्याचे फुल झडते अन् त्याची शोभा मिटून जाते तसेच विश्वासी धनवान, पण आपल्या कामात मग्न रायतो, खतम होऊन जातीन. देव परीक्षा घेत नाई 12 धन्य हाय, तो माणूस जो परीक्षेमध्ये स्थिर रायते, कावून कि जवा तो माणूस परीक्षेमध्ये सफल होईन, तवा त्याले अनंत जीवनाच इनाम भेटीन, ज्याची प्रतिज्ञा देवाने आपल्या प्रेम करणाऱ्या संग केली हाय. 13 जवा कोणाची परीक्षा होते, तवा त्यानं हे नाई म्हणावं, कि माह्याली परीक्षा देवाच्या इकून होते, न तर वाईट गोष्टीमुळे देवापासून परीक्षा होते, अन् ना देव स्वता कोणाची परीक्षा करते 14 लोकं आपल्याचं बेकार इच्छेमुळे बेकार काम करतात, अन् स्वताचं परीक्षामध्ये पडतात. 15 मंग जर कोणी बेकार काम करण्याची इच्छा करतात, ज्याच्या कारणाने ते पाप करून बसतात, अन् जे माणसं पाप करत रायतात, त्यायचा परिणाम त्यायच्यासाठी अनंत काळाचे मरण हाय. 16 हे माह्या प्रिय विश्वासी भावायनो, धोका नका खाऊ. 17 कावून कि हरएक चांगलं वरदान अन् हरएक उत्तम दान स्वर्गातून हाय, अन् ते ऊजीळाले बनवणारा देवबापाच्या इकून ते मिळाले हाय, कावून कि देव नेहमी एक सारखाच हाय, अन् तो आपल्या सावली सारखा नेहमी बदलत नाई. 18 त्यानं आपल्याचं इच्छेन आपल्याले सत्याच्या वचनाच्या व्दारे नवीन जीवन देलं हाय, यासाठी आमी त्यानं सृष्टी केलेल्या प्राण्यायच्या मधात वावराच्या पयल्या फळासारखे महत्वपूर्ण ठरते. आयकने अन् त्यावर चालणे 19 हे माह्या प्रिय विश्वासी भावायनो हे गोष्ट तुमी जाणून घ्या, माणूस आयकण्यात तत्पर असावा, बोलण्यात कमी असावा अन् क्रोध करण्यात धीमा असावा. 20 कावून कि माणसाच्या राग देवाच्या धार्मिकते मध्ये चलू नाई शकत, अन् देवाले प्रसन्न नाई करू शकत. 21 तुमी लोकं बेकार आदत अन् बेकार वागणुकीले दूर करून त्या देवाच्या वचनाले नम्रतेने ग्रहण करा, जे ह्रदयात पेरले गेले हाय, अन् तुमच्या जीवाले तारण करू शकते. 22 फक्त देवाच्या वचनाले आयकणारे नका बनू जे स्वताले धोका देतात, पण वचनाले पालन करणारे बना. 23 कावून कि जो कोणी देवाच्या वचनाले आयकते पण त्याच्या अनुसार जीवन जगत नाई, तर तो त्या माणसा सारखा हाय, जो आपलं स्वाभाविक तोंड आरशात पायते. 24 यासाठी कि तो आपल्या स्वताले पाऊन चालला जाते, अन् लवकरच भुलून जाते कि तो कसा होता. 25 पण तो माणूस देवाच्या त्या सिद्ध नियमाले जे लोकायले स्वतंत्र करतात, सावध पणाने, अभ्यास करते, अन् ते जे त्याने आयकलं हाय, त्याले विसरत नाई, पण त्याच्या शिकवणीचे पालन करत हाय, अन् असे करण्याचे कारण देव त्याले आशीर्वाद देईन. भक्तीचा खरा रस्ता 26 जर कोणी स्वताले देवाचा भक्त समजत अशीन, अन् आपल्या जिभेले नियंत्रण नाई करत, तर तो स्वताले धोका देत हाय, अन् त्याची भक्ती व्यर्थ हाय. 27 आपला देवबापाच्या समोर शुद्ध अन् निर्मळ भक्ती हे हाय, कि अनाथाचा अन् विधवांच्या क्लेशात मध्ये त्यायची सुधी घ्यावी, अन् स्वताले जगाच्या बेकार आचरणापासून दूर ठेवतो. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation