Online Bible

- Reklamy -

इब्रानियों 1 - वऱ्हाडी नवा करार


पोराचा स्वभाव

1 खूप काळाच्या पयले, देवानं आपल्या बापदादाय सोबत, थोडे-थोडे करून खूप वेळा अलग-अलग प्रकाराने भविष्यवक्त्याच्या व्दारे गोष्टी केल्या.

2 पण या आखरीच्या दिवसामध्ये देवाने आपल्या पोराच्या व्दारे गोष्टी केल्या, हा तोच हाय, ज्याच्या व्दारे देवाने सगळ्या जगाची रचना केली, अन् त्याले देवाने सगळ्या वस्तुचा वारस ठरवले.

3 पोरगा स्वता परमधन्य देवाच्या गौरवाच्या ऊजीळाले प्रगट करते, अन् आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, कि तो हरेक प्रकारे देवासारखा हाय, अन् आपल्या सामर्थशाली वचनाच्या व्दारे, तो जो सगळ्या सृष्टीले बनून रायण्यासाठी मदत करते, त्याने लोकायले त्यायच्या पापापासून शुद्ध केले हाय, अन् त्यानंतर स्वर्गात गौरवशाली देवाच्या उजव्या बाजूने बसला हाय.

4 म्हणून त्याचे पद देवदूता पेक्षा अधिक महान हाय, कावून कि जे नाव त्याले देवापासून वारस मध्ये भेटले होते, तो त्या देवदूतायच्या नावापेक्षा आणखी जास्त श्रेष्ठ हाय.


येशू देवदूता पेक्षा श्रेष्ठ

5 देवाने कधीही आपल्या देवदूतायले असं नाई म्हतलं, “कि तू माह्याला पोरगा हायस, आज मी तुले आपल्या पोराच्या रुपात प्रगट करतो.” त्याने असे कोण्याही देवदूताले म्हतलं नाई, “कि मी त्याचा बाप बनीन, अन् तो माह्या पोरगा होईन.”

6 पण जवा देवाने आपल्या एकुलत्या पोराले जगात पाठविले, त्यानं म्हतलं, “सगळे देवदूत त्याले नमन करावे.”

7 पण देवदूताच्या बाऱ्यात हे म्हणतो, “देव आपल्या देवदूतायले वाऱ्या सारखा बनवतो, अन् आपल्या सेवकायले, धधकनाऱ्या आगी सारखा बनवतो”

8 पण पोराच्या बाऱ्यात म्हणते, “कि हे देवा तू नेहमी-नेहमी करिता राजा सारखा राज्य करणार, तू न्यायपूर्वक अधिकारानं राज्य करणार.

9 तू चांगले काम केले कि प्रेम करतो, अन् अधर्मी कामाविषयी घृणा करतो; यामुळे मी, तुह्या देवाने तुले निवडले हाय, तुह्या सगळ्या सोबत्याय पेक्षा पण तुले आदर अन् आनंद देला हाय.

10 तो पोराले म्हणते, प्रारंभी तू पृथ्वीची निर्मिती केली, तू सगळं काई बनवलं जे अभायात हाय.

11 ते तर नाश होऊन जाईन, पण तू नेहमी बनून रायशीन, अन् ते सगळे कपड्यासारखे जुने होऊन जातीन.

12 तू त्यायले कपड्याय सारखा गुंडाळशिन, ते कपड्याय सारखे बदलल्या जातीन, पण तू बदलनार नाई, तुह्या जीवनाचा कधीही शेवट होणार नाई.”

13 देवाने आपल्या कोणत्या हि देवदूताले कधी नाई म्हतलं, कि “माह्या उजव्या हातावर आदराने बस, जोपरेंत मी तुह्या वैऱ्याले हारवून, तुह्या आधीन जोपरेंत नाई करत.”

14 तर मंग देवदूत कोण हायत? ते फक्त देवाचे सेवक हायत, देव त्यायले त्या लोकायची देखभाल करण्यासाठी पाठवते, जे तारण प्राप्त केलेले हायत.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy