गलातियों 1 - वऱ्हाडी नवा करारपौलूसच्या इकून अभिवादन 1-2 मी, पौलूस हे पत्र गलातिया प्रांताच्या मंडळीले लिवत हाय, जो कोण्या माणसाकडून किंवा कोणत्या माणसा व्दारे प्रेषित नेमलेल्या गेलो नाई हाय, पण स्वता येशू ख्रिस्त अन् देवबापाने मले प्रेषित नेमलेलं हाय, ज्याने ख्रिस्ताले मेलेल्यातून जिवंत केले हाय. अन् जे विश्वासी लोकं अती माह्या संग हायत, ते पण तुमाले नमस्कार करतात. 3 आपला देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुमी लोकायले कृपा अन् शांती देवो. 4 आपल्या देवबापाच्या इच्छेच्या नुसार येशू ख्रिस्ताने आपल्या स्वताले आमच्या पापामुळे बलिदान केले यासाठी कि आपण या वर्तमान जगाच्या लोकायच्या बेकार प्रभावापासून वाचवून राहावे. 5 त्याचाच गौरव युगानुयुग होतं राहो. आमेन. फक्त एकच सुवार्था 6 मले आश्चर्य वाटते, कि ज्या देवाने तुमाले ख्रिस्ताच्या कृपे व्दारे बलावले, त्याच्यापासून तुमी येवढ्या लवकर फिरून दुसऱ्या प्रकारच्या सुवार्थेकडे फिरून रायले हा. 7 पण ते दुसरी सुवार्था हायच नाई, पण गोष्ट अशी हाय, कि किती तरी लोकं असे हायत, जे तुमाले घाबरून टाकतात, अन् ख्रिस्ताच्या सुवार्थेला बिगडवण्याचा प्रयत्न करतात. 8 पण जर आमी किंवा स्वर्गातला कोणता देवदूता मधला कोणता दूत पण त्या सुवार्थेले सोडून जे आमी तुमाले सांगतली हाय, कोणती दुसरी सुवार्था तुमाले सांगीन, तर तो श्रापित हो. 9 जसं आमी पयले तुमाले सांगतले हाय, तसचं मी आता परत तुमाले म्हणतो हाय, कि त्या सुवार्थेले सोडून जे तुमी ग्रहण केले हाय, कोणती दुसरी सुवार्था तुमाले सांगीन तर तो श्रापित हो. 10 हे पक्कं हाय, मले कोणत्या माणसाची मान्यता मिळवायची नाई हाय, मले देवाची मान्यता मिळवायची हाय. मले कोणत्या माणसाले संतुष्ट करायचं नाई हाय, कावून कि जर मी आतापरेंत माणसायले खुश करत रायलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक बनलो नसतो. प्रेषिताय साठी बुलाहट 11 हे विश्वासी भावायनो, मी तुमी लोकायले विश्वास देतो, कि मी जे सुवार्था सांगतली हाय, ते माणसाच्या व्दारे बनवलेली नाई हाय. 12 कावून कि मी कोण्या धार्मिक शिक्षकाय व्दारे ते स्वीकारले नाई किंवा शिकलो नाई, पण येशू ख्रिस्ताने माह्यावर प्रगट केली हाय. 13-14 भावायनो, यहुदी धर्मातल्या माह्या पयलेच्या वागणुकीच्या बाऱ्यात तुमाले मालूम हाय, कि त्यावाक्ती मी येशूच्या शिष्यायले जे देवाची आराधना करत होते, त्यायले सतावण्यासाठी पूर्ण पणे लागून होतो, अन् मी त्या सगळ्या मंडळीले नाश करण्याचा प्रयत्न केला, अन् मी यहुदी धर्मातल्या बऱ्याचं माह्या वयाच्या यहुदी लोकाय पेक्षा खूप समोर होतो. मी आपल्या पूर्ण शक्तीने ते करण्यासाठी समर्पित होतो, जे आमच्या बापदादायन आमाले सोपले होते. 15-16 पण तवा देवाने निर्णय घेतला कि आपल्या पोराले माह्यावर प्रगट करावे, कि मी अन्यजाती लोकायच्या मधात येशूच्या बाऱ्यात सुवार्था प्रचार करू शकू. देवचं हाय ज्याने मले जन्माच्या पयलेचं निवडले अन् आपल्या कृपेमुळे त्याने मले त्याची सेवा करण्यासाठी बलावले. जवा येशूने आपल्या स्वताले माह्यावर प्रगट केले, तवा मी सल्ला घेण्यासाठी कोणत्या माणसापासी नाई गेलो. 17 अन् जे माह्या पयले प्रेषित होते, त्यायले भेटण्यासाठी मी यरुशलेम शहरात नाई गेलो, पण अरब देशात चालला गेलो, अन् मंग ततून परत दमिश्क शहरात वापस आलो. 18 मंग तीन वर्षाच्या बाद मी पतरसले (कैफा) भेटण्यासाठी यरुशलेम शहरात गेलो, त्याच्या जवळ पंधरा दिवस रायलो. 19 त्यावाक्ती मी फक्त ज्या प्रेषित संग भेटू शकलो, तो प्रभूचा भाऊ याकोब होता. 20 देव माह्या साक्षी हाय, जे गोष्ट मी तुमाले लिवत हाय, त्याच्यात काई पण खोटं नाई हाय. 21 याच्यानंतर मी सिरिया प्रांताच्या अन् किलिकिया प्रांतात गेलो. 22 पण यहुदीया प्रांताच्या मंडळीत जे ख्रिस्ती विश्वासी होते ते मले व्यक्तीगत पणे ओयखत नव्हते. 23 पण त्यायनं आयकलं होते, कि एका वेळी जो आमाले सतावत होता, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते त्या लोकायले नाश करण्याचा प्रयत्न करत होता, आता तोच त्या विश्वासाच्या सुवार्थेच्या प्रचार करून रायला हाय. 24 म्हणून ते देवाचा गौरव करतात, कावून कि देवाने मले एक सतावनाऱ्या मधून ख्रिस्ताच्या शिष्यामध्ये बदलवले हाय. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation