Online Bible

- Reklamy -

इफिसियों 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी, पौलूस देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो. मी हे पत्र येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या देवाच्या लोकायले लिवत हावो, जे इफिसुस शहरात रायतात.

2 मी प्रार्थना करतो, कि आपला देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुमी लोकायले कृपा अन् शांती देवो.


ख्रिस्तामध्ये मुक्ती

3 धन्य हाय देव, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप! ख्रिस्त येशूच्या संग आमचा समंध असल्यामुळे त्याने आपल्याले स्वर्गातले हरेक प्रकारचे आत्मिक आशीर्वाद देले हाय.

4 देवाने जगाच्या स्थापने पूर्वी, ख्रिस्तामध्ये आपला समंध बनल्यामुळे आपल्याले निवडले, ज्याच्यामुळे त्याच्या नजरीत पवित्र अन् निर्दोष बनावं.

5 कावून कि देवाने आपल्यावर प्रेम केले, अन् त्याच्या मनाच्या चांगल्या इच्छेच्या अनुसार पयलेच निर्णय घेतला होता, कि येशू ख्रिस्ताच्या व्दारे आपण त्याचे दत्तक लेकरं बनावे,

6 कि आपण देवाच्या गौरवशाली कृपेमुळे त्याची स्तुती करावी. हि कृपा आपल्याले त्याच्या प्रिय पोरापासून मिळाली.

7 कावून कि आपल्याले ख्रिस्ताच्या रक्ताच्या व्दारे मुक्ती म्हणजे पापायची क्षमा प्राप्त झाली हाय. हे देवाच्या मोठ्या कृपेचा परिणाम हाय.

8 अन् त्यानं त्या कृपेले आपल्या सगळ्या ज्ञान अन् समज संग आपल्याले भरपूर प्रमाणात देलं हाय.

9 देवाने स्वताच्या इच्छेचा भेद चांगल्या उद्देशाच्या नुसार आमच्यावर प्रगट केला, जे त्याने ख्रिस्ताच्या व्दारे त्या कामाले पूर्ण करण्यासाठी निर्धारित केले होते.

10 जवा ह्या योजनेचा पूर्ण होण्याचा वेळ येईन, तवा देव स्वर्ग अन् पृथ्वीच्या सगळ्या वस्तुले ख्रिस्ताच्या अधिकाराच्या आधीन एकत्र करीन, कि ख्रिस्त ह्या सगळ्या गोष्टीवर स्वामी असावा.

11 देवाने आमी यहुदी लोकायले ख्रिस्तामध्ये आपले लोकं होण्यासाठी निवडलं हाय, कि आपण देवा कडून विरासत प्राप्त करावी. कावून कि हे सुरवाती पासूनच त्याची योजना होती. त्यानं आपल्या योजना अन् इच्छे अनुसारच केलं.

12 आमी यहुदी, पयले लोकं हावो ज्यायनं ख्रिस्तावर आशा ठेवली होती, अन् आमी याच्यासाठी निवडल्या गेलो होतो, कि आमी देवाच्या गौरवाच्या स्तुतीचे कारण असावे.

13 अन् तुमी पण खऱ्याचे वचन अर्थात तारणाची सुवार्था आयकून प्रभू येशूवर विश्वास केला, अन् त्याने प्रतिज्ञा केलेल्या पवित्र आत्म्याच्या व्दारे तुमच्यावर ठप्पा लावला हाय.

14 हा पवित्र आत्मा आपल्यासाठी विरासतची इसार चिट्टी हाय, ज्याले देण्याची प्रतिज्ञा देवाने आपल्या लोकाय संग केली हाय. यामुळे आपल्याले विश्वास हाय कि देव त्याच्या लोकायले पूर्ण पणे मुक्ती देईन. ज्याच्यामुळे आपण देवाचा गौरव अन् स्तुती करावी.


आत्मिक ज्ञानासाठी प्रार्थना

15-16 जवा पासून मी आयकलं हाय कि प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा मजबूत विश्वास अन् त्याच्या प्रेमाच्या बाऱ्यात जे तुमी देवाच्या लोकाय संग ठेवता, तवा पासून मी तुमच्यासाठी देवाचा धन्यवाद करत रायतो, अन् नेहमी तुमाले आपल्या प्रार्थनेत आठवण करत रायतो.

17 मी प्रार्थना करतो, कि देव, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरवशाली बाप, तुमाले आत्मिक ज्ञान अन् समज देवो, कि तुमी त्याले पूर्ण पणे ओयखू शकावे.

18 मी हे पण प्रार्थना करतो, कि आपल्या मनाच्या डोयाच्या ऊजीळमय असल्यामुळे तुमाले माईत व्हावं, कि तुमच्या बलावण्याची आशा काय हाय, अन् देवाच्या लोकायसाठी त्याची प्रतिज्ञा केलेली आशीर्वाद किती महान अन् गौरवशाली हाय.

19-20 मले वाटते कि तुमी हे ओयखावे कि देवाची सामर्थ किती महान हाय, जे ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्याच्या अंदर कार्य करते. हे तेच महान सामर्थ हाय ज्याच्या व्दारे देवाने ख्रिस्ताले मेलेल्यातून परत जिवंत करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले.

21 त्या जागेवर देवाने ख्रिस्ताले हरेक प्रकारची प्रधानता, अधिकार, सामर्थ, प्रभूत्व, अन् हरेक नावाच्या वर जे फक्त ह्याच लोकात नाई तर येणाऱ्या लोकात पण हरेक नावाच्या वर प्रधान ठरवलं हाय.

22 त्याने सगळं काई ख्रिस्ताच्या आधीन केलं, अन् त्याले मंडळीच्या भलाई साठी सगळ्या गोष्टीवर प्रधान ठरवलं.

23 मंडळी ख्रिस्ताचे शरीर हाय. मंडळी ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या व्दारा भरलेली हाय, जे सगळ्या प्रकारे पूर्ण पणे भरली हाय.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy