Online Bible

- Reklamy -

कुलुस्सियों 1 - वऱ्हाडी नवा करार


नमस्कार

1-2 मी पौलूस, देवाच्या इच्छाने येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो, अन् तीमुथियुसच्या इकून कुलुस्सी शहरातील रायनाऱ्या ख्रिस्तामधील पवित्र लोकायले, अन् विश्वासयोग्य भावायले हे पत्र लिवत हाय. मी प्रार्थना करतो, आमचा देवबाप अन् येशू ख्रिस्ताच्या इकून कृपा अन् शांती तुमाले मिळत राहो.


धन्यवाद

3 जवा आमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तवा आमी नेहमी देवाचे, म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या बापाचे धन्यवाद मानतो

4 कावून कि, आमी आयकलं हाय कि ख्रिस्त येशूवर तुमच्या विश्वास हाय अन् सगळ्या पवित्र लोकायवर प्रेम करता.

5 तुमचा विश्वास अन् प्रेम त्या आशेवर अवलंबून हाय, जे तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित ठेवल्या गेलं हाय, ज्याच्या बाऱ्यात, तुमी पयलेचं आयकलं, जवा काई लोकं सगळ्यात पयले तुमच्यापासी आले, अन् ख्रिस्त येशूची सुवार्था तुमाले सांगतली, जे देवाचे खरे वचन हाय.

6 तिले आयकून बरेचशे लोकं विश्वास करू रायले हाय, अन् सुवार्था जगात पसरत हाय, अन् या गोष्टीले पूर्ण पणे समजले होते, कि देव किती कृपाळू हाय. पक्कं हेच तुमच्या मधात त्या वेळेपासून होऊन रायले हाय, जवा तुमी पयल्या वेळी सुवार्था आयकली होती.

7 आमचा आवडता सहकर्मी इपफ्रास जो इकून तुमच्यापासी आला, अन् त्याची शिकवण तुमी शिकले हा. तो आमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासयोग्य सेवक हाय.

8 त्यानचं आमाले तुमच्या त्या प्रेमाबद्दल सांगतले, जे तुमाले पवित्र आत्म्याच्या व्दारे भेटलं हाय.


आत्मिक उन्नती साठी प्रार्थना

9 जवा पासून आमी तुमच्या बाऱ्यात आयकलं हाय, आमी पण लगातार तुमच्यासाठी प्रार्थना अन् विनंती करत रायतो की, देवाचा आत्मा तुमाले सगळे आत्मिक ज्ञान व बुद्धी देवो कि ज्याने तुमी त्याची इच्छा पूर्ण पणे समजू शकावे.

10 म्हणून तुमी प्रभूच्या योग्य जीवन जगून सगळ्या गोष्टीत त्याले प्रसन्न करावे, कि तुमी हरेक प्रकारच्या चांगले कार्य करत राहावे, कि तुमी देवाले ओयखण्यास वाढत जावे.

11 त्याची गौरवाची शक्तीच्या अनुसार, सगळ्या प्रकारच्या सामर्थ्याने बलवान होतं जा, कि तुमी धीरज अन् खुशीने आपल्या कष्टाले सहन करू शकाल.

12 अन् ऊजीळाच्या राज्यात पवित्र लोकायसोबत विरासत मध्ये तुमी सहभागी व्हावे, म्हणून ज्यानं तुमाले योग्य केले, त्या देवबापाले तुमी धन्यवाद केले पायजे.

13 कावून कि त्यानचं आपल्याले अंधाराच्या ताब्यातून सोडवून त्याच्या आवडत्या पोराच्या राज्यात आणले हाय.

14 ज्याच्याच्यान आमाले आपल्या पोराच्या बलिदान रक्ता व्दारे देवाने आपल्याले मुक्ती अर्थात पापाची क्षमा देली हाय.


ख्रिस्ताची श्रेष्ठता अन् त्याचे कार्य

15 ख्रिस्त येशू न दिसणाऱ्या देवाचं प्रतिरूप हाय सारी सृष्टी बनण्याच्या पयले, तो उपस्थित होता, अन् सगळ्या सृष्टी केलेल्या वस्तुवर सर्वश्रेष्ट हाय.

16 त्याच्याच व्दारे देवाने स्वर्गात अन् पृथ्वीवर सगळं काई बनवलं, दिसणार असो किंवा न दिसणार, आधिपत्य असो किंवा अधिकार, आध्यात्मिक शक्ती असो किंवा प्रभूत्व सगळं काई त्यायच्या व्दारे अन् त्याच्यासाठी सृष्टी केल्या गेली हाय.

17 ख्रिस्त सृष्टीच्या पयले पासून हाय, त्याच्याच व्दारे सगळ्या वस्तु व्यवस्थित पणे कार्य करतात.

18 तोचं आपल्या शरीराचा म्हणजे मंडळीचा मुख्य हाय, तो सुरवाती पासून हाय, अन् मेलेल्यातून पयला जिवंत झालेला हाय, म्हणून तो सगळ्या गोष्टीत सर्वात श्रेष्ठ हाय.

19 कावून कि देवबापाचा आनंद याच्यातचं हाय कि ख्रिस्तात देवाचा पूर्ण स्वभाव वास करावा.

20 ख्रिस्ताने जे वधस्तंभावर जे रक्त वायल, त्याच्यापासून देवाने मेलमिलाप शांतीची स्थापना केली; हेच देवाचा चांगली योजना होती, कि तो ख्रिस्ता व्दारे सगळ्यायचं या पृथ्वीवर या स्वर्गात आपल्या संग एकजूट करावे.

21 तुमी लोकं पण आपल्या बेकार कामामुळे देवापासून दूर झाले, अन् तुमच्या मनात शत्रूता भरून गेली होती.

22 पण आता देवाने आपल्या पोराच्या मानव शरीरात मरणाच्या व्दारे तुमच्या संग मेलमिलाप केलं हाय, ज्याने तो तुमाले पवित्र निर्दोष अन् निष्कलंक बनून आपल्या समोर सादर करावे.

23 पण तुमाले ख्रिस्तावर विश्वासाच्या आधारावर मजबूत अन् अटल बनून रायले पायजे, अन् त्या सुवार्थाच्या आशेले जे तुमी आयकली सोडू नका ज्याचा प्रचार अभायाच्या खाली साऱ्या सृष्टी मध्ये केला गेला; अन् ज्याचा मी पौलूस सेवक बनलो.


मंडळीसाठी परिश्रम

24 या वाक्ती मी तुमी लोकायसाठी जे दुख सोसत हाय, या कारणाने मी प्रसन्न हावो. मी ख्रिस्ताच्या रायलेल्या दुखाले मंडळीच्या भलाई करिता आपल्यावर घेऊन, पूर्ण करण्यास मदत करत हाय.

25 मी देवाच्या प्रबंधाच्या अनुसार मंडळीचा सेवक तर निवडल्या गेलो हाय, कि मी देवाच्या आज्ञाचा पूर्ण पणे प्रचार करू शकू.

26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या परेंत गुप्त ठेवलेले होते, पण आता, देवाच्या पवित्र लोकायवर प्रकट झाले हाय, ते हे वचन हाय.

27 देवाने त्यायले दाखवण्याची इच्छा केली, कि अन्यजाती मध्ये या रहस्याची किती गौरवी समृद्धी हाय. ते रहस्य हे हाय, कि ख्रिस्त तुमच्या मधात हाय, अन् त्याच्यात तुमी लोकायची गौरवाची आशा हाय.

28 आमी त्याचा प्रचार करून हरेक माणसाले सावध करतो, अन् सगळ्या ज्ञानाने हरेक माणसाले आमी शिकवतो, ज्याने हरेक माणसाले ख्रिस्तात सिद्ध बनून त्यायच्या समोर सादर करावे.

29 यासाठी त्याची जी शक्ती माह्यामध्ये सामर्थ्याने त्याचे कार्य चालवत हाय, म्हणून मी तन मन लावून परिश्रम करत हावो.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy