Online Bible

- Reklamy -

3 यूहन्ना 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी योहान, मंडळीचा पुढारी हे पत्र प्रिय गयुसच्या नावान लिवून रायलो हाय, ज्याले मी खरे प्रेम करतो.

2 हे प्रिय भावा, माह्याली हे प्रार्थना हाय, कि जशी तू आत्मिक उन्नती करून रायला हाय, तसाचं तू सगळ्या गोष्टीमध्ये उन्नती कर, अन् चांगला अन् स्वस्त राहा.

3 मी लय खुश झालो, जवा काई विश्वासी भावायन येऊन तुह्या त्या सत्याची साक्ष देली, ज्याच्यावर तू खरोखर चालत हाय.

4 मले याहून मोठा कोणताही आनंद नाई, कि मी हे आयकू, कि माह्याले लेकरं देवाच्या दाखवल्या गेलेल्या सत्य रस्त्यावर चालतात.


चांगल्या कामासाठी बढाई

5 हे प्रिय, तू त्या कामात खूप विश्वासयोग्य हायस जे तू आपल्या विश्वासी भावायसाठी करतो, ज्याले तू ओयखत पण नाई.

6 त्यायनं इथच्या मंडळीच्या समोर तुह्याल्या चांगल्या प्रेमाच्या पूर्ण व्यवहाराची साक्ष देली होती. जर तू त्यायले त्या प्रकारे वाटे लावशीन तर चांगलं करशीन. ते देवाच्या लोकाच्या साठी योग्य हाय.

7 कावून कि ते अन्यजातीच्या लोकायपासून काईच मदत न घेता, अन् ख्रिस्ताच्या सेवेसाठी बायर निघाले हाय.

8 म्हणून अशा लोकायचा पाहूनचार केला पायजे, म्हणजे आपण सत्यासाठी त्यायचे सहकारी होऊ.


दियुत्रिफेस अन् दिमेत्रियुस

9 मी मंडळीले काई लिवले होते, पण दियुत्रिफेस जो त्यायच्यात मोठा बण्याले पायतो, तो माह्या आदेशाले नाई मानत.

10 म्हणून जवा मी येईन, त्याच्या कामाची जे तो करू रायला हाय दाखवून देईन, कि तो आमच्या बाऱ्यात बेकार-बेकार गोष्टी करतो; अन् तो फक्त आमची बदनामीचं नाई करत तर तो स्वता भाऊ बहिणींचा अतिथी सत्कार करायची इच्छा ठेवत नाई, अन् जे लोकं असं करायले पायतात, तो त्यायले अडवते अन् मंडळीपासून त्यायचा बहिष्कार करते.

11 माह्या प्रिय भावा, जे चांगले हाय त्याचे अनुकरण कर. वाईटाचे अनुकरण करू नको. चांगले काम करणारा देवापासून हाय, वाईट काम करणाऱ्याने देवाला ओयखत नाई.

12 मंडळीत प्रत्येकजण देमेत्रियाच्या बाऱ्यात चांगली साक्ष देतात, कि तो सत्याच्या अनुस्वार जीवन जगतो, आमी पण त्याच्या बाऱ्यात हे साक्ष देतो, अन् तुमाले माईत हाय की, आमची साक्ष खरी हाय.


शेवटचे अभिवादन

13 मले तुले खूप गोष्टीच्या विषयी सांगायच हाय, पण याप्रकारे पत्रात लिवण्याची इच्छा नाई.

14 पण मले आशा हाय कि मी तुमच्यापासी लवकरच येणार, अन् तुमच्या संग अमोरा-समोर गोष्टी करीन.

15 देव तुले शांती देवो, तुह्ये दोस्त तुले नमस्कार सांगतात. तितच्या सगळ्या दोस्तायचे नाव घेऊन-घेऊन आमचा नमस्कार सांग.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy