Online Bible

- Reklamy -

2 तीमुथियुस 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1-2 मी, पौलूस देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित हाय, मले त्या कधी न सरणाऱ्या जीवनाचा प्रचार करण्यासाठी पाठवल्या गेलं हाय, जो ख्रिस्त येशूवर विश्वास करण्याच्या व्दारे देवाने देण्याचा वायदा केला हाय. मी हे पत्र तीमुथियुस तुले लिवत हावो, जो माह्या पोरा सारखा हाय. देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुले कृपा, दया, अन् शांती देवो.


विश्वासयोग्यते साठी प्रोत्साहन

3 मी आपल्या बापदादाय सारखा शुद्ध मनाने, देवाची सेवा करतो, अन् देवाले धन्यवाद देऊन नेहमी रातदिवस तुले आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवतो.

4 मले आठोन हाय, कि तू किती रडला होता, जवा मी तुह्या पासून दूर झालो होतो, म्हणून मले तुह्या संग परत भेटण्याची इच्छा होते, कि माह्या मन आनंदाने भरलं पायजे.

5 तवा मले तुह्या त्या निष्कपट विश्वासाची आठवण येते, हा विश्वास पयले तुह्याली आजी लोईस, अन् तुह्याली माय युनिके मध्ये होता, अन् मले विश्वास हाय, कि आता हा विश्वास तुह्या अंदर पण हाय.

6 हेच कारण हाय, कि मी तुले आठवण देत हावो, कि देवाच्या व्दारे भेटलेल्या त्या वरदानाले पूर्ण पणे उपयोग कर, जे तुह्यावर माह्ये हात ठेवल्यामुळे तुह्या अंदर हाय.

7 हे यासाठी कि देवाने आपल्याले भेवाची नाई, पण सामर्थ्याचा आत्मा देला हाय, जे आपल्याले दुसऱ्यावर प्रेम कराले, अन् स्वतावर संयम ठेवायले मदत करते.


सुवार्थेसाठी लाज धरू नको

8 म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयात दुसऱ्याले सांगण्यासाठी लाज धरू नको, अन् माह्यामुळे पण लाज धरू नको, जो ख्रिस्त येशूची सेवा केल्यामुळे जेलात हावो, पण देवाच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवून तू माह्या संग सुवार्थेसाठी कष्ट सहन करत राहा.

9 देवाने आमचे तारण केले हाय, अन् आमाले पवित्र जीवन जगण्यासाठी बलावले हाय. त्यानं आपल्याले चांगल्या कामाच्या आधारावर नाई, पण त्याचा उद्देश अन् त्याच्या कृपेमुळे असं केले हाय, सुरवाती पासून हे देवाची योजना होती, (कि आपल्याले प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मिळत राहो.)

10 पण आता ख्रिस्त येशू, जो आपल्याले तारण देते, या जगात आला हाय, अन् आपल्यावर कृपा केली हाय. येशूने मरणाचा नाश केला अन् आपल्या सुवार्थेच्या व्दारे अनंत जीवनाच्या ऊजीळात आणले हाय.

11 मी त्या सुवार्थेसाठी देवाने मले प्रचारक प्रेषित, अन् शिक्षक, ठरवलं हाय.

12 या कारणाने मी पण दुख भोगत हाय, पण मी याने लाजत नाई, कावून कि मले माईत हाय, कि मी कोणावर भरोसा ठेवला हाय, अन् मले पूर्ण खात्री हाय, कि ख्रिस्ताने मले जे देलं हाय, त्याले तो त्याच्या परत येण्याच्या दिवसापरेंत सुरक्षित ठेवण्यात समर्थ हाय.


विश्वासाच्या प्रती इमानदार

13 जे खरी शिकवण तू माह्यापासून घेतली हाय, त्याचे पालन कर, असं विश्वास अन् प्रेमासोबत कावून कि तू ख्रिस्त येशूच्या संग एकजूट हायस.

14 आमच्या अंदर रायनाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या व्दारे त्या खऱ्या शिकवणीचे रक्षण कर, जे तुले सोपलं हाय.

15 तुले हे मालूम हाय, कि आशिया प्रांताचे बरेचं विश्वासी लोकायन मले सोडून देलं हाय, त्यायच्यात फुगिलूस अन् हिरमुगिनेस पण हायत.

16 उनेसिफुरुस घरावर प्रभू दया करो, तो मले बऱ्याचं वेळा भेट्याले येऊन माह्यी हिम्मत वाढवली हाय, अन् मले जेलात येऊन भेटण्याची त्याले लाज नाई वाटत.

17 कावून कि जवा तो रोम शहरात होता, त्याने प्रयत्न करून मले शोधून माह्याली भेट घेतली.

18 प्रभू त्याले हे वरदान देवो, कि त्याले न्यायाच्या दिवशी प्रभूच्या इकून दया प्राप्त व्हावी. त्याने इफिसुस शहरात किती सेवा केली हाय, तुमाले हे चांगल्या प्रकारे मालूम हाय.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy