Online Bible

- Reklamy -

2 थिस्सलुनीकियों 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी, पौलूस, तीमुथियुस अन् सिलास, थिस्सलुनी शहराच्या मंडळीले हे पत्र लिवत हावो, जे आपला देवबाप अन् ख्रिस्त येशूचे हायत.

2 आमी हे प्रार्थना करत हावो, कि देवबाप तुमाले प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने कृपा अन् शांती देवो.


न्यायाचा दिवस

3 हे विश्वासी भावायनो, तुमचा साठी देवाले नेहमी धन्यवाद देयाले पायजे. आमच्यासाठी असं करणे योग्य हाय, कावून कि येशू ख्रिस्तामध्ये तुमचा वाढता विश्वास अन् हरेक गोष्टीत आपसातले प्रेम दिवसानं दिवस वाढत हाय.

4 म्हणून आमी स्वता देवाच्या मंडळीत तुमी लोकायवर घमंड करतो, कावून कि जेवळे दुख अन् संकट तुमी सहन करता, त्या सगळ्यात तुमचा धीरज अन् विश्वास प्रगट होते.

5 या सगळ्या पासून हे प्रमाणित होते, कि देवाचा न्याय खरा हाय, ज्याचा मुळे तुमी देवाच्या राज्याच्या योग्य समजले जासान, ज्याच्यासाठी तुमी हे सगळे दुख भोगत हा.

6 देवाच्या नजरेत हे नेहमी बरोबर हाय, कि तो त्या लोकायले बदल्यात दुख देतो जे तुमाले दुख देतात.

7-8 अन् तुमी जे दुख सहन करत हा, अन् आमाले पण त्यावाक्ती आराम देईन जवा प्रभू येशू प्रगट होईन, अन् आपल्या सामर्थशाली देवदूताय संग प्रज्वलित आगीमध्ये स्वर्गातून उतरणार. तवा तो त्या लोकायले दंडीत करणार जे देवाले ओयखत नाईत अन् आपल्या प्रभू येशूची सुवार्था आयक्याले मना करतात.

9 अशा लोकायले प्रभूच्या सानिध्यात अन् त्याच्या गौरवशाली सामर्थ्या पासून दूर करून विनाशाचे अनंत दंड भेटीन.

10 हे त्या दिवशी होईन जवा प्रभू येशू आपल्या पवित्र लोकायच्या मधात गौरवीत होतीन, अन् सगळ्या विश्वास करणाऱ्या लोकायमध्ये आश्चर्याचे कारण बनतीन, ज्यायनं विश्वास केला हाय, तुमी पण त्यायच्यात सहभागी व्हा, कावून कि तुमी आमच्या संदेशावर विश्वास केला हाय.

11 म्हणून आमी नेहमी तुमी लोकायसाठी प्रार्थना करत हावो, कि आपला देव तुमाले त्या योग्य बनविण, जसं त्याने तुमाले जीवन जगण्यासाठी बलावले हाय, अन् तो तुमची हरेक चांगली इच्छा परिपूर्ण करीन, अन् विश्वासाच्या हरेक कामाले सामर्थ्यासहित पूर्ण करीन.

12 याप्रकारे आपल्या देवाचे अन् प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या व्दारे आपल्या प्रभू येशूच्या नाव तुमच्यात गौरवीत होईन, अन् तुमी लोकं पण त्याच्यात गौरवीत होसान.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy