2 पतरस 1 - वऱ्हाडी नवा करारनमस्कार 1 मी, शिमोन पतरस, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक अन् प्रेषित हावो, हे पत्र सगळ्यायसाठी लिवत हावो, ज्यायनं आपला देव अन् तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकते व्दारा आपल्या सारखा बहुमुल्य विश्वास मिळविला हाय. 2 मी प्रार्थना करतो, कि जसे-जसे तुमी देव अन् आपल्या प्रभू येशूच्या ज्ञानात वाढत हाय, देव तुमाले खूप-खूप कृपा अन् शांती दे. विश्वासात उन्नती 3 देवाने आपल्या सामर्थ्या व्दारे आपल्याले सगळं काई देले हाय, जो आपल्याले भक्तीमय जीवन जगण्यासाठी पायजे, अन् आपले लोकं होण्यासाठी बलावले हाय, अन् त्याच्याचं ज्ञानामुळे आपल्याले गौरव अन् भलाई मिळवण्याच्या योग्य बनविले हाय. 4 त्याचं शक्तिशाली सामर्थ्या व्दारे देवाने आपल्यायले बहुमुल्य अन् खूप मोठी प्रतिज्ञा देली हाय, कि त्याच्या व्दारे तुमी त्या अशुद्धता पासून सुटून जे जगात बेकार वासने पासून होते, ईश्वरीय स्वभावात सहभागी होऊन जा. 5 तुमी देवाच्या स्वभावात सहभागी हा, म्हणून तुमच्या विश्वासात उन्नती होण्यासाठी, तुमाले नेहमी जे दुसऱ्यासाठी चांगले हाय, तेच करण्याचा खूप प्रयत्न करायला पायजे, अन् त्याच्या सोबत-सोबत तुमाले असे लोकं बण्याले पायजे, ज्यायले समजूत पणाने व्यवहार करणे माईत हाय. 6 तुमाले समजदारीने व्यवहार करण्या सोबत संयमी पण होयाले पायजे, संयमी होण्याच्या सोबत संकटामध्ये धीरज पण ठेवायला पायजे, अन् या सोबत तुमाले अशाप्रकारे जीवन जगायला पायजे, जे देवाले प्रसन्न करते. 7 तुमाले देवाले आदर देण्याचे जीवन जगण्या सोबत, तुमाले आपल्या विश्वासी भावाय सोबत प्रेम पण करायला पायजे, अन् या सोबत तुमाले सगळ्या लोकायसोबत प्रेम करायला पायजे. 8 जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात हायत, अन् वाढत हायत, तर ह्या तुमाले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात उपयोगी अन् फलदायक होण्यासाठी मदत होईन. 9 पण जर कोणता व्यक्ती अशाप्रकारे जगत नाई, तर तो अशा व्यक्ती सारखा हाय, जो फुटका हाय, तो भुलला हाय, कि देवाने त्याले त्या पापाकरिता क्षमा केले हाय, जे त्याने ख्रिस्तात विश्वास करण्याच्या आगोदर केले होते. 10 म्हणून हे विश्वासी भावायनो, तुमी हे पष्ट करण्याची प्रयत्न करा, कि देवाने खरोखर तुमाले आपली प्रजा होण्यासाठी निवडले हाय, अन् बलावले हाय! जर तुमी असे कराल तर तुमी निश्चित पणे देवापासून अलग नाई होसान. 11 अन् अशाप्रकारे तुमी आपल्या प्रभू अन् तारणकर्ता येशू ख्रिस्ताच्या कधी न सरणाऱ्या राज्यात मोठ्या आदराने प्रवेश कराल. पतरसची आखरी वेळ 12 जरी पयले पासूनच तुमी या गोष्टीले जाणता, अन् ख्रिस्ताच्या विषयात खरी शिक्षेला मजबुतीने धरून हा, मी तुमाले त्यायच्या बाऱ्यात आठवण देणे निरंतर सुरु ठेवीन. 13-14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मले पष्ट केले हाय, कि मी लवकरच मरून जाणार हाय, म्हणून मले वाटते कि माह्यासाठी हे बरोबर हाय, जरी मी आता जिवंत हावो, तर मी तुमाले या गोष्टीची आठवण देत राहू. 15 म्हणून मी या गोष्टीले आता लिवल्यामुळे तुमाले सांगण्यासाठी खूप मेहनत करत हाय, कि माह्या मरणानंतर तुमी हरेक वेळी यायले आठवण ठेवाल. ख्रिस्ताच्या गौरवाचे दर्शन 16 कावून कि जवा आमी प्रेषितायन तुमाले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची सामर्थ्य अन् वापस येण्याच्या बाऱ्यात सांगतले, तर आमी चतुराईने काई बनवलेल्या कथा नाई सांगत होतो, पण आमी त्याचा प्रताप आपल्या डोयाने पायले होते. 17-18 कावून कि जवा त्याने देव बापापासून आदर अन् गौरव मिळवला हाय, तवा आमी त्याच्या सोबत त्या पवित्र पहाडावर होतो, तवा आमी स्वर्गातून प्रतापमय गौरव अर्थात परमधन्य देवाचा आवाज त्याले हे म्हणतांना आयकली, “हा माह्या प्रिय पोरगा हाय, ज्याच्यावर मी खूप प्रसन्न हावो” 19 आमाले पण मालूम हाय, कि ख्रिस्ताच्या विषयात भविष्यवक्त्यायनं जे संदेश लिवलेले होते, ते खरोखर खरे होते, अन् जे आमी त्याच्या वापस येण्याच्या बाऱ्यात शिकवले होते, ते त्याची पुष्टि करतात, तुमाले ते वचन चांगल्या प्रकारे आयकलं पायजे कावून कि जसा अंधारात चमकणारा दिवा लोकायले खरा रस्ता दाखवण्यास मदत करते, तसेच हे वचन तुमाले हे जाणून घेण्यास मदत करतीन कि खरं काय हाय, आपला प्रभू येशू ख्रिस्त वापस येण्यापरेंत तुमाले ते वचन चांगल्या प्रकारे आयक्याले पायजे, त्याचे येणे एक नवीन दिवसाच्या सकाळच्या ऊजीळासारखे हाय, अन् तो सकाळच्या ताऱ्या सारखा असणार, त्या वेळेस त्याचा ऊजीळ तुमच्या मनात चमकणार, अन् तुमच्या समोर देवाले पष्ट रूपाने प्रगट करीन. 20 पण हे महत्वपूर्ण हाय, कि तुमी या गोष्टीले समजा, कि पवित्रशास्त्रात तुमी भविष्यवक्त्यायचे जे वचन वाचता, ते फक्त कोण्या माणसाचे आपले विचारचं नाई हायत. 21 कावून कि कोणती पण भविष्यवाणी माणसाच्या इच्छेनुसार नाई येत, पण पवित्र आत्मा भविष्यवक्तायले उत्तेजित करून देवाच्या इकून बोलण्यासाठी अगुवाई करते. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation