2 यूहन्ना 1 - वऱ्हाडी नवा करारपुढारी लोकायपासून निवडलेल्यायले अभिवादन 1 मी योहान, मंडळीचा पुढारी, हे पत्र त्या निवडलेल्या बाई अन् तिच्या लेकरायले लिवतो, ज्यायच्या संग मी खरे प्रेम करतो, अन् फक्त मीच नाई पण ते सगळे पण प्रेम करतात जे सत्याले ओयखतात. 2 देवाचे ते सत्य जे आमच्यात बनून रायते, अन् नेहमी आमच्या सोबत राईन. 3 देवबाप अन् त्याचा पोरगा येशू ख्रिस्ताची कृपा अन् दया, अन् शांती, त्या लोकायसोबत बनून राहो, जे लोकं प्रेम अन् खरेपणाने जीवन जगतात. ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये चालणे 4 मी हे पाऊन लय आनंदित हावो, कि तुह्याले काई लेकरं खऱ्या रस्त्यावर चालून रायले हाय, जे आज्ञा आमाले देव बापाकडून भेटलेली हाय. 5 आता हे बाई, मी तुले विनंती करतो कि एकादुसऱ्यावर प्रेम करा. मी तुले कोणता नवीन आदेश नाई लिवत, पण तोच आदेश लिवून रायलो हाय, कि जे आपल्याले सुरवाती पासून भेटला हाय. 6 अन् प्रेम हे हाय कि आपण देवाच्या आज्ञाच्या अनुसार चालावे. हे तेच आज्ञा हाय, जे तुमी सुरवाती पासून आयकली, अन् तुमाले यावर चालावे पण लागण. ख्रिस्तविरोधीच्या धोक्यापासून सावधान 7 मी तुमाले याच्यासाठी आठवण करून देऊन रायलो, कावून कि बरेचं लोकं चुकीची शिकवण देऊन दुसऱ्यायले धोका देतात, ते सगळ्या जागी पसरले हायत; ते असे म्हणतात कि येशू ख्रिस्त एका माणसाच्या रुपात ह्या जगात नाई आला असे भरमावणारे लोकं ख्रिस्तविरोधी हायत. 8 म्हणून तुमाले सावध रायाले पायजे कि जे मेहनत आमी सगळ्यायने केली हाय, त्याले तुमी गमाऊ नका, पण त्याचे पूर्ण फळ प्राप्त करा. 9 जो कोणी माणूस ख्रिस्ताच्या शिकवणीले मानत नाई, पण त्याच्यातून बायर निघून जाते, त्याचा देवा संग समंध नाई, जो कोणी त्याच्या शिकवणीवर बनून रायतो, त्याचा समंध देवबाप अन् त्याचा पोरगा दोघायच्या पण संग हाय. 10 जर कोणी तुमच्यापासी येईन, अन् ख्रिस्ताच्या शिकवणी पेक्षा काई अलग शिकवण देत अशीन तर त्याले घरात येऊ देऊ नका, अन् त्याचे स्वागत पण करू नका. 11 कावून कि, जो कोणी अशा माणसाचे स्वागत करतो तो त्याच्या बेकार कामामध्ये सहभागी होतो. शेवटचे अभिवादन 12 मले बरेचशा गोष्टी तुमाले लिव्याच्या हायत, पण मी त्या गोष्टीले याप्रकारे पत्रात लिवण्याची इच्छा नाई. पण मले आशा हाय, कि मी तुमच्यापासी येणार, अन् अमोरा-समोर गोष्टी करीन, कि आमी पूर्ण पणे आनंदित व्हावे. 13 तुह्या बहिणीचे लेकरं ज्यायले देवानं निवडलं, ते तुले नमस्कार करतात. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation