2 कुरिन्थियों 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 मी पौलूस, देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो. ख्रिस्तात आपला भाऊ तीमुथियुसच्या इकून, कुरिन्थुस शहराच्या देवाच्या मंडळीले अन् अखाया प्रांताच्या सगळ्या पवित्र लोकायले, हे पत्र लिवत हाय. 2 मी प्रार्थना करतो, कि आपला देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुमी लोकायले कृपा अन् शांती देवो. शांतीचा देव 3 आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा देव अन् बापाची स्तुती हो, जो दयेचा बाप हाय, अन् सगळ्या सांत्वनेचा स्त्रोत हाय. 4 देव आपल्याले आपल्या साऱ्या दुखामध्ये सांत्वना देतो, कि आपण हि दुसऱ्या लोकायले दुखामध्ये त्याचं प्रकारे सांत्वना देऊ शकावे, जसा देव आपल्याले सांत्वना देतो. 5 कावून कि ज्याप्रकारे आपण तरास सहन करतो, तसेच ख्रिस्ताने पण तरास सहन केला, तशीच आपल्या सांत्वनेत ख्रिस्ताच्या व्दारे आणखी सहभागी होतं हाय. 6 जर आपण संकटाचा सामना करतो, तर हे तुमच्या सांत्वना अन् तारणासाठी हाय, अन् जर आमाले सांत्वना मिळते, ते तुमाले सांत्वना मिळावे यासाठी मिळते, म्हणजे असं कि जे दुख आमी सहन करतो, ते सहन करण्यासाठी तुमाले सामर्थ्य मिळते. 7 अन् आमची आशा तुमच्या विषयात मजबूत हाय, कावून कि आमाले मालूम हाय, ज्याप्रकारे तुमी आमच्या दुखात सहभागी होता, त्याचं प्रकारे तुमी आमच्या सांत्वना मध्ये पण सहभागी होसान. दुखापासून वाचणे 8 हे विश्वासी भावायनो, मले वाटते कि तुमी त्या संकटाले समजा, जे आशिया प्रांतात आमच्यावर झाले होते, कि कसे आमाले दुख सहन करावे लागले, ते कष्ट खूप भारी होते, अन् आमच्या सामर्थ अन् सहन शक्तीच्या बायर होते, आमी तर जगण्याची पूर्ण आशा सोडली होती. 9 अन् आमी हे समजत होतो, कि आमाले प्राणदंड मिळाले हाय, हे यासाठी झाले, कि आमी स्वतावर नाई पण देवावर भरोसा ठेवावा, जो मेलेल्यायले परत जिवंत करतो. 10 त्याने आमाले त्या मोठ्या मरणाच्या संकटापासून वाचवले हाय, अन् तो असाच करणार, त्याच्यावरचं आमची आशा हाय, कि भविष्यात हि आमाले वाचविन. 11 कावून कि तुमी लोकायन पण प्रार्थने व्दारे आमची मदत करावी, अशाप्रकारे खूप साऱ्या प्रार्थनेमुळे आमाले आशीर्वाद भेटीन, यासाठी बरेचं लोकं देवाचा धन्यवाद करतीन, कावून कि आमच्या सुरक्षेकरिता खूप साऱ्या लोकायची प्रार्थना आयकल्या गेली हाय. शुद्ध विवेक 12 आपण मोठ्या हिम्मतीने अन् शुद्ध मनाने हे म्हणू शकतो, कि आपण सगळ्या कामामध्ये इमानदार रायलो हाय, आमी अशाचं प्रकारे पवित्रतेने अन् खरेपणाने सगळ्यायच्या सोबत व्यवहार पण केला हाय, विशेष करून तुमच्या सोबत आमी त्या विचारानुसार नाई जगलो, जे या जगातल्या लोकाय व्दारे ज्ञानी समजल्या जातात, पण देवाच्या कृपेवर अवलंबून होता. 13-14 आमी नेहमी तुमाले अशाप्रकारे लिवतो, कि तुमी वाचू शकावे अन् समजू शकावे, आता तर तुमी आमाले थोड्या प्रमाणात समजता, पण मले आशा हाय, कि तुमी आमाले पूर्ण पणे समजसान, कि तुमी आमच्यावर तसेच घमंड करावे. तवा आमी तुमच्यावर घमंड करणार ज्यावाक्ती प्रभू येशू वापस येणार. प्रवासात परिवर्तन 15 मले पूर्ण भरोसा होता, कि तुमी मले समजून घ्यान, म्हणून मले वाटत होते कि मी तुमच्यापासी परत वापस यावे, अन् तुमाले दुप्पट आशीर्वाद देऊ शकावे. 16 माह्याली योजना होती, कि मी तुमच्या पासून होऊन मकिदुनिया प्रांताले जाऊ, अन् मंग मकिदुनिया प्रांतातून तुमच्यापासी वापस येऊ, अन् मले आशा होती कि ततून मले यहुदीया प्रांतात पोहचण्या करिता तुमी मदत कराल. 17 म्हणून माह्या निश्चय हाच होता. पण काय मी विनाकारण आपले विचार बदलले? काय मी लोकायच्या विचाराच्या अनुसार करायला पायतो? जे पयले हो, हो, म्हणतात अन् मंग नाई, नाई, म्हणतात. 18 ज्याप्रकारे देव विश्वासयोग्य हाय, त्याचं प्रकारे जे आमी तुमाले सांगत हावो, ते पण नेहमी खरं हाय. 19 कावून कि देवाचा पोरगा येशू ख्रिस्ताचा प्रचार आमच्या व्दारे अर्थात मी अन् भाऊ सिलास, अन् भाऊ तीमुथियुस व्दारे तुमच्या मधात केला गेला, तो प्रचार कधी “हो” या कधी “नाई” असा नाई होता, पण देवामध्ये नेहमी “होच” रायला हाय. 20 कावून कि देवाच्या जेवड्या प्रतिज्ञा हायत, त्या सगळ्या ख्रिस्तात पूर्ण होतात, म्हणून आमी “आमेन” म्हणतो, कि आमच्या व्दारे देवाचा गौरव व्हावा. 21-22 देवचं हाय, जो तुमच्या सोबत आमाले ख्रिस्तात मजबूत करते, देवाने आमच्यावर आपला ठसा लावून आपला आत्मा आमच्या ह्रदयात ठेवून आमचा अभिषेक केला हाय. 23 देव माह्या या खराईचा साक्षी हाय, मी दुसऱ्यांदा कुरिन्थुस शहरात यासाठी नाई आलो, कि तुमाले कष्ट देण्याचा माह्या विचार नाई होता. 24 याचा अर्थ हा नाई, कि आमी तुमच्या विश्वासावर आपला अधिकार ठेवावे, कावून कि तुमी आपल्या विश्वासात स्थिर उभे हा, आमी तर तुमच्या आनंदाकरीता तुमच्या सोबत सहभागी हावो. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation