Online Bible

- Reklamy -

1 तीमुथियुस 1 - वऱ्हाडी नवा करार


अभिवादन

1 मी, पौलूस, आपला तारणहारा अन् ख्रिस्त येशूच्या अन् देवाच्या अधिकाराच्या व्दारे येशू ख्रिस्ताच्या एक प्रेषित हावो, ज्याच्यात आपल्याले आशा हाय, हे पत्र तीमुथियुस तुले लिवत हावो, जो विश्वासात माह्या खरा पोरगा हाय.

2 देवबाप अन् आपला प्रभू येशू ख्रिस्त तुमाले कृपा, दया, अन् शांती देवो.


खोट्या शिकवणुकीच्या बाऱ्यात चेतावणी

3 मी मकिदुनिया प्रांतात जातांना तुले विनंती केली होती कि इफिसुस शहरात राऊन त्या खोट्या शिक्षकायले सांग कि खोटी शिकवण देणे बंद करा.

4 अन् त्या काल्पनिक कथेवर अन् वंशावळ्याच्या लांब सूची वर ध्यान देऊ नको, त्याने मतभेद उत्पन्न होतात, पण देवाचे ज्ञान मिळत नाई, जे विश्वासावर आधारित हाय.

5 माह्यी आज्ञा देण्याचा हा उद्देश हाय, कि तुमी एकादुसऱ्यावर शुद्ध मनाने अन् चांगला विवेकाने अन् निष्कपट विश्वासाने प्रेम करा.

6 काई लोकं या रस्त्याले सोडून बेकारच्या वादविवादा मध्ये भटकले हाय.

7 ते मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक होण्याच्या दावा करतात, पण ते ज्या शब्दाचा उपयोग करतात, अन् ज्या विषयावर एवढे महत्व देतात, त्या गोष्टीले स्वता त्यायले समजत नाई.

8 आमाले माईत हाय, कि मोशेचे नियमशास्त्र उत्तम हाय, जर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जाईन तर.

9 हे तुमाले माईत हाय, कि मोशेचे नियमशास्त्र धर्मी लोकायसाठी नाई, पण धर्माचा विरोध करणारे अन् निरंकुश लोकायसाठी भक्तीहीन अन् पापी, अपवित्र अन् अशुद्ध, माय-बापाले ठार मारणारे, अन् हत्यारे,

10 व्यभिचारी, पुरुषगामी, माणसायले ईकणारे, खोटे बोलणारे, खोटी शपत खाणारे, यांचासाठी हाय, अन् जे खऱ्या शिकवणीच्या विरुद्ध हाय, अन् जर काई दुसरे अशीन तर त्यायच्यासाठी पण हाय.

11 हे शिकवण सुवार्थेवर आधारित त्या गौरवाच्या बाऱ्यात हाय, जे धन्य देवाची हाय. देवाने मले ते सुवार्था सोपली हाय.


पौलूसची साक्ष

12 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मी धन्यवाद देतो, ज्याने मले शक्ती देली हाय, अन् मले विश्वासयोग्य समजून आपल्या सेवेसाठी निवडलं हाय.

13 मी तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करायच्या पयले ख्रिस्ताची निंदा करणारा होतो, अन् ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्यायले सतावनारा होतो, अन् क्रूरता पूर्वक व्यवहार करणारा होतो; पण माह्यावर कृपा केली गेली, कावून कि ख्रिस्तावर अविश्वासाच्या कारणाने मले हे मालूम नाई होतं कि मी काय करून रायलो हाय.

14 आपल्या प्रभू येशूने त्याची कृपा भरपूर पणे माह्यावर ओतली, अन् सोबतच तो विश्वास अन् प्रेम पण जे आपल्याले येशू ख्रिस्ताच्या व्दारे भेटते प्राप्त झाला.

15 हि गोष्ट विश्वसनीय अन् पूर्ण पणे मानण्याच्या योग्य हाय, कि येशू ख्रिस्त पापी लोकायले वाचव्यासाठी जगात आला, अन् त्यायच्यात सगळ्यात मोठा पापी मी हाय.

16 पण देवाची दया माह्यावर झाली, कि माह्यासारख्या अत्यंत पापी माणसावर येशू ख्रिस्ताने सहनशीलता दाखवली, कि त्या लोकायसाठी एक उदाहरण प्रस्तुत करावे, जे अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी त्याच्यावर विश्वास करतीन.

17 आता सर्व काळापरेंत राज्य करणारा राजा जो कधी नाश होतं नाई, अन् अदृश्य हाय, अशा एकाच देवाचा सन्मान, अन् गौरव सदा सर्वकाळासाठी होतं राहो. आमेन


तीमुथियुसचे उत्तरदायित्व

18 माह्या पोरा तीमुथियुस, हे माह्यी आज्ञा हाय जे मी तुले देत हावो, जे भविष्यवाणी पयले तुह्या बाऱ्यात झाली हाय, त्याच्या अनुसार मी तुले हा भार सोपवून रायलो हाय; तू त्यापासून शक्ती प्राप्त कर, अन् विश्वास अन् शुद्ध मनाने भरून खोट्या शिकवणीच्या विरुद्ध चांगली लढाई लढ.

19 काई लोकायन आपल्या अंतकरणाच्या आवाजाचा तिरस्कार केला, अन् या कारणाने, त्यायचा ख्रिस्तावरचा विश्वास नष्ट झाला.

20 त्यायच्यातून हुमिनयुस अन् सिकंदर हाय; मी त्यायले सैतानाच्या ताब्यात देले, ज्याच्याच्यान त्यायनं हे शिकवण घ्यावी कि देवाची निंदा नाई करायले पायजे.

Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Následuj nás:



Reklamy