1 थिस्सलुनीकियों 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 हे पत्र मी, पौलूस अन् सिलास अन् तीमुथियुस थिस्सलुनी शहराच्या मंडळीले लिवत हाय. मी प्रार्थना करतो कि देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुमाले कृपा अन् शांती मिळत राहो. थिस्सलुनीच्या लोकायचा विश्वास 2 आमी आपल्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो, अन् तुमच्या सगळ्यायच्या बद्दल देवाचा धन्यवाद करतो. 3 जवा आमी आपल्या देवबापाले प्रार्थना करतो, तर तुमच्या त्या कामाले जे तुमी ख्रिस्तात तुमच्या विश्वासाच्या कारण करता, अन् त्या कठीण परिश्रमाले पण जे तुमी प्रेमासाठी दुसऱ्याले ख्रिस्तात विश्वास करण्यासाठी मदत करता. अन् आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशेच्या धीरतेले आमी नेहमी स्मरण करतो. 4 अन् हे आमच्या विश्वासी भावायनो, आमाले मालूम हाय कि देव तुमच्यावर प्रेम करते, अन् तुमाले निवडलं हाय, कि तुमी त्याचे लोकं बनावे. 5 कावून कि, प्रभू येशूची सुवार्था तुमच्यापासी फक्त बोलण्यानेचं नाई, पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासहित मोठ्या खात्रीने तुमच्यापासी पोचली हाय; तुमाले मालूम हाय, कि तुमच्या फायद्यासाठी तुमच्या मधात आमची वागणूक कशी होती. 6 तुमी मोठे दुख सहन करून पवित्र आत्म्याच्या आनंदाने संदेशावर विश्वास केला. अन् तुमी आमचे अन् प्रभू येशूचे अनुसरण केले. 7 अतपर्यंत कि मकिदुनिया प्रांत अन् अखाया प्रांतातल्या सगळ्या विश्वासी लोकायसाठी तुमी आदर्श बनले. 8 कावून कि तुमच्या इकून प्रभूचा संदेश फक्त मकिदुनिया अन् अखाया प्रांतातचं नाई पण सगळ्या युनान प्रांतात पसरला, अन् देवात तुमच्या विश्वासाची चर्चा सगळीकडे होतं हाय, याच्या बाऱ्यात आमाले काई सांगण्याची आवश्यक्ता नाई हाय. 9 कावून कि लोकं स्वता आमाले सांगतात कि जवा आमी तुमच्यापासी आले होतो, कशाप्रकारे तुमी आमचं स्वागत केलं, अन् कशाप्रकारे मुर्त्या सोडून देवाकडे फिरले, ज्याच्याच्यान तुमी खऱ्या अन् जिवंत देवाचे सेवक बनले हा. 10 अन् त्याच्या पोराची स्वर्गातून परत येण्याची वाट पायत हा, म्हणजे येशूची वाट पाहत हा, ज्याले देवाने मेलेल्यातून जिवंत केलं. हाचं येशू स्वर्गातून उतरीन अन् आपल्याले येणाऱ्या न्याय अन् संकटापासून वाचविन. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation