1 पतरस 1 - वऱ्हाडी नवा करारनमस्कार 1 मी, पतरस, येशू ख्रिस्ताचा प्रेषित हाय, हे पत्र देवाच्या निवडलेल्या त्या लोकायकरिता लिवत हाय, जे पुन्तुस, गलातिया प्रांत, कप्पूदुकिया, आशिया प्रांत, अन् बितुनिया प्रांताच्या विभिन्न शहरात परदेशी लोकायसारखे रायतात. 2 देवबापाने आगोदरचं तुमाले आपल्या इच्छेनुसार आपले लोकं होण्यासाठी, अन् पवित्र आत्म्याच्या कार्या व्दारे तुमाले पवित्र करण्यासाठी निवडले हाय, त्याने असे याकरिता केले, कि तुमी येशू ख्रिस्ताच्या आज्ञाचं पालन करावे, अन् त्याच्या रक्ता व्दारे शुद्ध होऊन जावे, मी प्रार्थना करतो, कि देव तुमाले कृपा अन् भरपूर शांती देवो. एक स्वर्गीय विरासत 3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव अन् बापाचा धन्यवाद हो ज्याने आपल्या प्रती स्वता आपल्या मोठ्या दयेने आपल्याले जिवंत आशेसाठी एक नवीन जीवन देले, कावून कि देवाने येशू ख्रिस्ताले मरणातून परत जिवंत केले. 4 आपण त्या महान वारसाले मिळवण्यासाठी खूप इच्छुक रायतो, जे देवाने आपल्या लोकायसाठी ठेवली हाय. त्याने त्यायले तुमच्या करिता स्वर्गात ठेवले हाय, जती ते सडत नाई, खराब होतं नाई, अन् नष्ट होतं नाई. 5 देवाने आपल्या महान सामर्थ्याने तुमाले सुरक्षित ठेवले हाय, कावून कि तुमी येशूवर भरोसा ठेवता, तो आखरी दिवसापरेंत जवा परेंत ख्रिस्त वापस येणार, तवा परेंत तुमाले वाचवून ठेवीन. 6 तुमाले या सगळ्या गोष्टी विषयी आनंदित होयाले पायजे, जरी थोड्या दिवसासाठी विभिन्न प्रकारच्या समस्या तुमाले परेशान करू शकतात. 7 या संकटाचे उद्देश हे हाय, कि तुमचा देवावरचा विश्वास परीक्षेच्या व्दारे खरा निघावा. येशू ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास सोन्याहून अधिक किंमती हाय! जसं नाशवान सोन्याले आगीत पारखल्या जाते, अन् शुद्ध केल्या जाते, त्याचं प्रकारे जर तुमचा विश्वास अग्निमय परीक्षेमध्ये पारखल्या जाण्याच्या नंतर हि मजबूत रायते! तर हे त्या दिवशी तुमाले खूप प्रशंसा अन् गौरव अन् आदर देणार, जवा येशू ख्रिस्त परत वापस येणार. 8 तुमी येशूले कधी नाई पायले, तरीही तुमी त्याला प्रेम करता, तुमी त्याला आता पण पायलं नाई, तरीही तुमी त्याच्यावर विश्वास करता, म्हणून तुमी आनंद अन् गौरवाने भरून खुपचं आनंदित हा, जे शब्दामध्ये बोलल्या जाऊ शकत नाई. 9 तुमी आनंदित हा, कावून कि तुमच्या आत्म्याचे तारण होते. ख्रिस्त येशू मध्ये हे तुमचे प्रतिफळ हाय. भविष्यवक्त्यायची साक्षी 10 हे तारण असे होते, ज्या बद्दल भविष्यवक्तायले आणखी ओयखायची इच्छा होती, त्यायनं तुमाले मिळणाऱ्या कृपेच्या बाऱ्यात भविष्यवाणी केली होती. 11 ख्रिस्ताचा आत्मा भविष्यवक्त्याय मध्ये होता, अन् त्यायले सांगत होता, कि ख्रिस्त कसा दुख सहन करीन, अन् मंग त्या दुखा नंतर कशाप्रकारे गौरव प्राप्त करणार, म्हणून त्यायनं हे मालूम करण्याचा प्रयत्न केला, कि ख्रिस्त कोण असणार, अन् हे कधी होणार. 12 पण देवाने या भविष्यवक्त्यांना सांगतले कि त्यायचे संदेश त्यायच्या स्वताकरिता नाई, पण तुमच्या करिता हायत. तो संदेश येशू ख्रिस्ताच्या बाऱ्यात सुवार्था हाय, जे तुमी आता आयकली हाय. देवाने स्वर्गातून पवित्र आत्मा पाठवला कि तुमाले सुवार्था प्रचार करण्यासाठी लोकायची मदत करावे. हे एवढे अद्भभुत हाय, कि हे सगळं देवदूत पण आनंदाने हे सगळं पाऊन रायले हाय. 13 म्हणून आपल्या मनाले तयार करा, जसे लोकं काम करण्यासाठी आपल्या कमरीले कचून बांधतात, अर्थात हे कि जे काई तुमी विचार करता, त्यावर तुमी नियंत्रण ठेवले पायजे. असे पूर्ण पणे अन् विश्वासाने करा, त्या तारणाले मिळवण्याची आशा ठेवा, जे देव कृपेने तुमाले देणार, जवा येशू ख्रिस्त स्वर्गातून वापस येणार. 14 देवाच्या आज्ञाचं पालन करा, कावून कि तुमी त्याचे लेकरं हा, त्या बेकार कामाले करू नका, जे तुमी पयले करत होते, जवा तुमी देवाच्या खरेपणाले ओयखत नव्हते. 15 पण आता तुमाले हरेक कामामध्ये जे तुमी करता, पवित्र होयाले पायजे, कावून कि देव पवित्र हाय, ज्याने तुमाले आपले लेकरं होण्याकरीता निवडले हाय. 16 कावून कि पवित्रशास्त्रात हे लिवलेल हाय, “तुमी पवित्र असा कावून कि मी पवित्र हाय.” 17 जवा तुमी प्रार्थना करता, तवा देवाले आपला बाप म्हणता, पण आठवण ठेवा, तो सगळ्यायचा न्याय एकाच प्रकारे करतो, अर्थात हरेकाने काय केले हाय. म्हणून जोपरेंत तुमी या पृथ्वीवर एक परदेशी म्हणून रायता, म्हणून तुमाले त्याचा प्रती खुपचं आदराने राहावे लागीन. 18-19 तुमाले मालूम हाय, कि पयले तुमी बिनकामी जीवन जगत होते, जे तुमी आपल्या बापदादाय पासून शिकले होते, पण तुमी अशा निरर्थक जीवनापासून मुक्ती मिळविली होती, तुमी सोन्या अन् चांदी सारख्या नाशवान होणाऱ्या वस्तुपासून नाई विकत घेतले हा, पण ख्रिस्ताच्या अनमोल रक्ता व्दारे विकत घेतले हा, जो निर्दोष अन् निष्कलंक मेंढरा सारखा हाय. 20 हे जग निर्माण होण्याच्या आगोदर, देवाने आगोदरचं निर्धारित केले होते, कि येशू ख्रिस्त सोडवणारा असणार, अन् तो तुमची सहायता करण्यासाठी या आखरी दिवसामध्ये या जगात प्रगट होईन. 21 जे काई ख्रिस्ताने केले हाय, त्यामुळे तुमी आता देवावर विश्वास करता, अन् तुमी आपला विश्वास अन् आशा देवावर ठेवली हाय, कावून कि त्याने ख्रिस्ताले मरणातून परत जिवंत केले, अन् त्याला गौरव देला. 22 कावून कि आत्म्याच्या व्दारे खरेपणाचे पालन केल्यामुळे तुमाले शुद्ध केले हाय, आता तुमाले आपले सोबती विश्वासी भावाय सोबत निष्कपट पणाने प्रेम कराले पायजे, म्हणून एकामेकावर आनंदाने पूर्ण मनाने प्रेम करा. 23 कावून कि तुमाले देवाच्या इकून एक नवीन जीवन मिळाले हाय, तुमाले हे जीवन कोण्या अशा वस्तुपासून नाई मिळाले, जे नाश होते, पण देवाच्या जिवंत अन् अनंत वचनापासून भेटले हाय. 24-25 पवित्रशास्त्रात हे लिवलेले हाय, “सगळे लोकं गवतासारखे हायत, अन् त्यायची सुंदरता जंगलातल्या फुलासारखी हाय, गवत सोखुन जाणार अन् फुल जमिनीवर पडतील. पण देवाचे वचन नेहमी साठी ठिकून रायते.” हे वचन ख्रिस्ताच्या बाऱ्यात सुवार्था हाय, जे तुमच्या मध्ये प्रचार केले हाय. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation