1 यूहन्ना 1 - वऱ्हाडी नवा करारजीवनाच्या वचनाची घोषणा 1 आमी एका व्यक्तीच्या बाऱ्यात लिवत हावो, जो जीवनाचे वचन हाय, जो सुरवाती पासूनच होता, ज्याले आमी आयकलं, अन् ज्याले आपल्या डोयाने पायले, अतपर्यंत कि ज्याले आपण ध्यानपूर्वक पायले, अन् हातांनी स्पर्श केले. 2 हे जीवन ह्या पृथ्वीवर प्रगट झाले, अन् आमी त्याले पायले, अन् त्याचीच साक्ष देत हावो, अन् तुमाले त्या अनंत जीवनाची सुवार्था सांगत हावो, जो बापा पासी होता, अन् जे आमच्यावर प्रगट केल्या गेलं. 3 जे काई आमी पायले अन् आयकलं हाय, त्याची सुवार्था तुमाले पण सांगत हावो, यासाठी कि तुमी पण आमच्या संग सहभागी व्हावे. हे सहभागीता बापा संग, अन् त्याच्या पोरगा येशू ख्रिस्ताच्या संग हाय. 4 आपला आनंद पूर्ण व्हावा, म्हणून आमी या गोष्टी तुमाले लिवत हाय. देवाच्या सोबत सहभागीता 5 जे सुवार्था आमी येशू ख्रिस्तापासून आयकली हाय, ते तुमाले सांगत हावो, ते हे हाय, कि देव ज्योती सारखा हाय, अन् त्याच्यात काईच अंधार नाई. 6 जर आमी म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागीता हाय, अन् पापमय जीवन जगतो, तर आमी खोटे बोलत हावो, अन् सत्याच्या अनुसार नाई जगत. 7 पण जसा देव ऊजीळात हाय, तसे जर आपण ऊजीळासारखे जीवन जगत असलो, तर आमची अन् देवाची एकामेका बरोबर सहभागीता हाय, अन् त्याचा पोरगा येशूचे रक्त आपल्याले सगळ्या पापांपासून शुद्ध करते. 8 जर आमी असं म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाई, तर आमी स्वताले फसवतो अन् आपल्यापासी सत्य नाई हाय. 9 जर आपण आपल्या पापाले देवा समोर मानतो, तर देव आपल्या पापाले क्षमा करीन अन् आपल्याले सगळ्या अपराधापासून शुद्ध करीन, कावून कि तो विश्वासयोग्य अन् धर्मी हाय. 10 जर आमी म्हणतो की आमी पाप केले नाई तर आमी देवाले खोटं ठरवतो, अन् त्याच्या वचनाले नाई मानत. |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation