1 कुरिन्थियों 1 - वऱ्हाडी नवा करारअभिवादन 1 मी, पौलूस देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो, अन् विश्वासी भाऊ सोस्थिनेस कडून हे पत्र, 2 देवाच्या त्या मंडळीले लिवत हाय जे कुरिन्थुस शहरात हाय, अन् जे येशू ख्रिस्ताच्या व्दारे पवित्र केले गेले हाय, अन् त्या सगळ्याय संग पवित्र होण्यासाठी बलावल्या गेले हाय, जे हरेक जागी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा भरोसा करतात. 3 आपला देवबाप अन् प्रभू येशू ख्रिस्त तुमी लोकायले कृपा अन् शांती देवो. पौलूसचा देवाले धन्यवाद 4 तुमी लोकायले येशू ख्रिस्ताच्या व्दारे कृपा मिळाली हाय, यासाठी मी आपल्या देवाले नेहमी धन्यवाद देतो. 5 कावून कि तुमी ख्रिस्त येशू मध्ये सगळ्या प्रकाराने आशीर्वादित केले गेले हा, कावून कि तुमी ख्रिस्ताच्या सोबत एक हा, म्हणून त्याने तुमाले आपले शब्द बोलण्यासाठी अन् समजण्यासाठी सगळ्या प्रकारे विशेष क्षमता देली हाय. 6 अशाप्रकारे ख्रिस्ताच्या बाऱ्यात संदेश खरा हाय, हे देवाने तुमाले सिद्ध केले. 7 यामुळे या वाक्ती तुमच्यापासी तुमाले आवश्यक असलेली हरेक आत्मिक वरदान हाय, अन् आता तुमी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगट होण्याची वाट पायत हा. 8 देव आखरी परेंत तुमी लोकायले विश्वासात मजबूत बनवून ठेवीन, ज्याने तुमी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर परत येण्याच्या दिवशी निर्दोष असावे. 9 देव आपल्या वचनात विश्वासयोग्य हाय, त्यानेच तुमी लोकायले आपला पोरगा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागी बनण्यासाठी निवडलं हाय. कुरिन्थूसच्या मंडळीची विभागणी 10 हे विश्वासी भावायनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमाले विनंती करतो, कि तुमच्यात मेलमिलाप असावा अन् फुट नसावी, तुमी मन अन् मतात एक राहा. 11 कावून कि हे माह्या विश्वासी भावायनो, खलोयाच्या घरच्या लोकायपासून मले मालूम झालं हाय, कि तुमी लोकात फुट पडली हाय. 12 माह्य म्हणण्याचा उद्देश हा हाय, कि तुमच्या पैकी कोणी म्हणते, “मी पौलूसचा शिष्य हाय” कोणी म्हणते, “मी अपुल्लोसचा शिष्य हाय”; तिसरा कोणी म्हणते “मी कैफाचा शिष्य हाय” अन् कोणी म्हणते “मी तर ख्रिस्ताचा शिष्य हाय.” 13 हे चांगलं नाई कारण ख्रिस्त गटामध्ये विभागलेला नाई. काय पौलूस तुमी लोकायसाठी वधस्तंभावर मारल्या गेला होता? काय तुमी लोकायले पौलूसच्या नावाने बाप्तिस्मा मिळाला हाय? 14 मी देवाचा धन्यवाद करतो, कि मी क्रिस्पूस अन् गयुसले सोडून तुमच्यातून कोणाले पण बाप्तिस्मा देला नाई; 15 म्हणून कोणी हे नाई म्हणू शकत, कि तुमाले पौलूसच्या नावाने बाप्तिस्मा भेटला हाय. 16 हो! मी स्तिफनासच्या कुटुंबांले पण बाप्तिस्मा देला हाय. जतपरेंत मले आठवण हाय, मी याच्या व्यतिरिक्त कोणाले पण बाप्तिस्मा देला नाई. 17 कावून कि ख्रिस्ताने मले बाप्तिस्मा देण्यासाठी नाई पण सुवार्थेचा प्रचार करण्यासाठी पाठवले हाय. जवा मी सुवार्थेचा प्रचार करतो तवा मी बोलण्यात आपल्या कौशल्याचा वापर करत नाई, नाई तर लोकं फक्त माह्या कौशल्यामुळे विश्वास ठेवतीन अन् ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाची शक्ती त्यायले मालूम नाई होईन. ख्रिस्ताची शक्ती अन् देवाच ज्ञान 18 वधस्तंभाचा संदेश त्यायच्यासाठी जे नाश होणार हायत मूर्खता हाय, पण आमच्यासाठी, जे तारणाच्या रस्त्यावर हायत, देवाची सामर्थ्य हाय. 19 कावून कि पवित्रशास्त्रात देवाने म्हतलं हाय, “मी दाखविन कि ज्या लोकायचे विचार ह्या जगाच्या लोकायसाठी बुद्धीमान हाय, ते खरं म्हणजे मूर्खता पूर्ण विचार हाय.” 20 तर मंग, आपण या जगाच्या बुद्धीमान लोकायच्या बाऱ्यात काय म्हणू शकतो? मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायच्या बाऱ्यात आपण काय म्हणू शकतो, जे बोलण्यात हुशार हायत? देवाने त्या सगळ्या लोकायले मूर्ख बनवलं हाय, अन् त्यायच्या बुद्धीले बेकार दाखवलं हाय. 21 मी असं यासाठी म्हणतो, कावून कि देवाने समजदारीने हा निर्णय घेतला होता, कि या जगाचे लोकं आपल्या बुद्धीच्या व्दारे त्याले समजण्यात सक्षम नाई होते. म्हणून देव त्या लोकायले वाचव्यासाठी हाय, जे आमच्या व्दारे प्रचार केलेल्या सुवार्थेवर विश्वास ठेवतात, जरी काई लोकं या उपदेशाले मूर्खता समजतात. 22 यहुदी लोकं चमत्कार मांगतात अन् युनानी लोकं ज्ञान खोजणारे हायत, 23 पण आमी प्रचार करतो, कि आपल्याले पापापासून सोडवण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मेला, हे यहुदी लोकायच्या विश्वासामध्ये अडथळा हाय, अन् अन्यजातीच्या लोकायसाठी मूर्खता हाय. 24 पण देवाचे बलावलेल्या लोकायसाठी ते यहुदी असो किंवा युनानी लोकं दोघायसाठी हाच ख्रिस्त देवाची सामर्थ अन् देवाचं ज्ञान हाय. 25 कावून कि देवाची मूर्खता माणसाच्या ज्ञानापेक्षा अधिक ज्ञानवान हाय, अन् देवाची कमजोरी माणसाच्या शक्तीपेक्षा खूप शक्तिशाली हाय. फक्त प्रभू मध्येचं घमंड 26 हे विश्वासी भावायनो, या गोष्टीवर विचार करा कि जवा देवाने तुमाले बलावलं, तवा माणसाच्या नजरेने तुमच्यातून बरेचं लोकं बुद्धीमान, प्रतिष्ठित, किंवा धनवान नाई होते. 27 ज्ञानी लोकायले लज्जित करण्यासाठी, देवाने त्यायले निवडलं जे जगाच्या नजरेत मूर्ख हायत, अन् शक्तिशाली लोकायले लज्जित करण्यासाठी त्यानं त्या लोकायले निवडलं जे जगाच्या नजरेत कमजोर हायत. 28 देवाने त्या लोकायले निवडलं जे जगाच्या नजरेत खालच्या दर्जाचे हायत, तुच्छ हायत, अन् जे हायच नाई, कि त्यायले व्यर्थ करून टाकावे जे जगाच्या नजरेत महत्वपूर्ण समजले जातात. 29 कि कोणी पण माणूस देवाच्या समोर घमंड करू नये. 30 पण देवानं तुमाले ख्रिस्त येशूच्या संग एकजूट केलं हाय, अन् ख्रिस्ताच्या व्दारे तो आमाले ज्ञान देते. देव पण आपल्याले त्याच्या नजरेत धर्मी बनवते, पण ख्रिस्ताच्या व्दारे आपल्याले पवित्र बनवल्या जाते, अन् तो आपल्याले पापापासून मुक्त करते. 31 म्हणून, जसं कि पवित्रशास्त्रात लिवलं हाय, “जर कोणाले घमंड कराचं हाय, तर त्यानं देवावर घमंड करावे.” |
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation