Online Bible

- Reklamy -

स्तोत्रसंहिता 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य

1 राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत?

2 परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,

3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.”

4 स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.

5 पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.

6 तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”

7 मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;

8 माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;

9 लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”

10 राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.

11 भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1

12 पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Následuj nás:



Reklamy