Online Bible

- Reklamy -

यहोशवा 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मोशेने पराभूत केलेले राजे

1 ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे :

2 अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,

3 आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;

4 उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे,

5 आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.

6 ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यहोशवाने पराभूत केलेले राजे

7 यार्देनेच्या पश्‍चिमेस लबानोन खोर्‍यातील बाल-गादापासून सेईरास जाणार्‍या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोक ह्यांनी मोड केला ते हे : (हा देश यहोशवाने इस्राएलवंशांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून दिला,

8 तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)

9 यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,

10 यरुशलेमाचा राजा, हेब्रोनाचा राजा,

11 यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा,

12 एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,

13 दबीराचा राजा, गेदेराचा राजा,

14 हर्माचा राजा, अरादाचा राजा,

15 लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा,

16 मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा,

17 तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा,

18 अफेकाचा राजा, लशारोनाचा राजा,

19 मादोनाचा राजा, हासोराचा राजा,

20 शिम्रोन-मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,

21 तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,

22 केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,

23 नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल1 येथील गोयीमाचा2 राजा,

24 तिरसाचा राजा; ह्याप्रमाणे नगरागणिक एक असे एकंदर एकतीस राजे होते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Následuj nás:



Reklamy