यिर्मया 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’ Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो: जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी, जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’ Sien die hoofstuk |